Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold पेक्षा जास्त Silver ETF ने दिला परतावा; कामगिरी टिकाऊ की, धोक्याची घंटा? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:59 IST

जानेवारी 2022 मध्ये भारतात लॉन्च झालेल्या सिल्व्हर ETF ने अवघ्या चार वर्षांत चकित करणारे रिटर्न दिले आहेत.

Gold-Silver Investment: जानेवारी 2022 मध्ये भारतात लॉन्च झालेल्या सिल्व्हर ETF ने अवघ्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना चकित करणारे रिटर्न दिले आहेत. 6 फेब्रुवारी 2022 ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सिल्व्हर ETF वर सुमारे 62% परतावा(XIRR) नोंदवण्यात आला आहे. तुलनेत, याच कालावधीत गोल्ड ETF ने सुमारे 42% परतावा दिला. या मोठ्या फरकामुळे गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, आता पोर्टफोलिओमध्ये सिल्व्हरला प्राधान्य द्यावे का?

तज्ज्ञांच्या मते, सिल्व्हरची ही दमदार कामगिरी लो बेस इफेक्ट आणि पोस्ट-पँडेमिक मागणीमुळे झाली आहे. मात्र, सिल्व्हरच्या किमतींतील मोठ्या चढ-उतारमुळे रिटर्नसोबत जोखीमही अधिक असल्याचे ते सांगतात.

सिल्व्हरचे रिटर्न जास्त का?

CFP राजेश मीनोचा यांच्या मते, सिल्व्हर ETF वर दिसणारा 62% XIRR हा मुख्यत्वे लो बेस इफेक्टचा परिणाम आहे. 2022 मध्ये लॉन्चच्या वेळी सिल्व्हरच्या किमती खालच्या पातळीवर होत्या. त्यानंतर जागतिक आर्थिक अस्थिरता आणि औद्योगिक मागणीत वाढ झाल्याने सिल्व्हरच्या किमतींनी वेग घेतला.

दुसरीकडे, गोल्डची मागणी प्रामुख्याने सुरक्षित गुंतवणूक (सेफ हेवन) म्हणून असते. त्यामुळे गोल्ड तुलनेने स्थिर आणि सातत्यपूर्ण रिटर्न देतो. सिल्व्हरच्या एकूण मागणीपैकी सुमारे 50% हिस्सा औद्योगिक क्षेत्रातून येतो. त्यामुळे ते सेक्टरल बदलांवर अधिक अवलंबून राहते. याच कारणामुळे सिल्व्हरमध्ये रिटर्न जास्त असू शकतो, पण जोखीमही जास्त असते.

SILVER vs GOLD: आकडे काय सांगतात?

Asset Elixirचे संस्थापक शिवम पाठक सांगतात की, सिल्व्हर हे गोल्डपेक्षा अधिक वोलॅटाइल आहे. त्यामुळे सिल्व्हररी वाढ जलद होते, पण त्यासोबत घसरणीचा धोकादेखील मोठा असतो. रिपोर्ट्सनुसार, ICICI Pru Silver ETF, Aditya Birla SL Silver ETF आणि Nippon India Silver ETF यांनी 4 वर्षांत सुमारे 62% XIRR दिला आहे. तर, गोल्ड ETFमध्ये Quantum Gold Fund ETF ने 42.54% XIRR, तर LIC MF Gold ETF ने 42.16% XIRR रिटर्न दिला आहे.

SIP च्या बाबतीतही फरक स्पष्ट दिसतो

सिल्व्हर ETF मध्ये ₹10,000 मासिक SIP चे मूल्य सुमारे ₹1.46 लाख झाले. तर, गोल्ड ETF मध्ये हेच मूल्य सुमारे ₹1.04 लाख इतके राहिले.

पोर्टफोलिओ रिबॅलन्स करावा का?

तज्ज्ञांचे मत आहे की, पोर्टफोलिओमध्ये गोल्डला कोर होल्डिंग म्हणून ठेवणे अधिक योग्य आहे, कारण ते स्थिरतेसाठी उपयुक्त ठरते. सिल्व्हरला टॅक्टिकल किंवा सॅटेलाइट एक्सपोजर म्हणून समाविष्ट करता येईल; मात्र, फक्त मागील रिटर्न पाहून मोठ्या प्रमाणावर अलोकेशन करणे धोकादायक ठरू शकते.

राजेश मीनोचा यांच्या मते, सिल्व्हरमध्ये SIP आणि फेज्ड इन्व्हेस्टिंग पद्धतीने गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित आहे. तसेच, मल्टी-अॅसेट फंड्सद्वारे गुंतवणूक केल्यास फंड मॅनेजर इक्विटी, डेट आणि कमोडिटीजमध्ये परिस्थितीनुसार वाटप करतात, ज्यामुळे जोखीम कमी होऊ शकते.

अलीकडील वोलॅटिलिटी आणि अलोकेशन कॅप

जानेवारी 2026 मध्ये गोल्ड आणि सिल्व्हर दोन्ही धातूंच्या किमती विक्रमी पातळीच्या जवळ पोहोचल्या होत्या. मात्र, त्यानंतर अचानक मोठी घसरण झाली. 30 जानेवारी रोजी सिल्व्हरच्या किमती एका दिवसात 27% घसरल्या. तर, 31 जानेवारी रोजी आणखी 25% घसरण नोंदवली गेली. गोल्डमध्येही एका दिवसात 12% घसरण झाली. ही मार्च 2013 नंतरची सर्वात मोठी घसरण होती. या पार्श्वभूमीवर, मीनोचा आणि पाठक दोघेही सिल्व्हरच्या अलोकेशनवर मर्यादा ठेवण्याचा सल्ला देतात. 

(टीप-कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

English
हिंदी सारांश
Web Title : Silver ETF returns beat gold; sustainable or risky? Know details.

Web Summary : Silver ETFs outperformed gold recently due to low base effect and demand. Returns are higher but riskier. Experts advise caution, suggesting gold as a core holding and silver for tactical exposure, due to volatility.
टॅग्स :गुंतवणूकचांदीसोनं