Join us
Daily Top 2Weekly Top 5

पैसे आलेत, आता कर्जाची परतफेड करू की गुंतवणूक? तुमच्या मनातही हा प्रश्न आलाय, जाणून घेऊ नक्की काय करावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 15:24 IST

बचत आणि गुंतवणुकीचा नेमका ताळेबंद; 'इमोशनल' न होता 'फायनान्शिअल' विचार करा! हातात बोनसची रक्कम पडली की दोन विचार मनात येतात; एक म्हणजे डोक्यावरचं कर्जाचं ओझं हलकं करणं आणि दुसरा म्हणजे पैशातून पैसा वाढवणं.

बचत आणि गुंतवणुकीचा नेमका ताळेबंद; 'इमोशनल' न होता 'फायनान्शिअल' विचार करा! हातात बोनसची रक्कम पडली की दोन विचार मनात येतात; एक म्हणजे डोक्यावरचं कर्जाचं ओझं हलकं करणं आणि दुसरा म्हणजे पैशातून पैसा वाढवणं. हा केवळ नैतिक नव्हे, तर आर्थिक निर्णय आहे. तुमचा बोनस नेमका कुठे वापरावा, यासाठी तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे निकष सांगितलेत.

कर्जाचा प्रकार तपासा  

क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज वा कंझ्युमर ड्युरेबल लोन ही 'आर्थिक गळती' आहे. अशा कर्जांवर १८%पर्यंत व्याज लागतं. हे व्याज वाचवणं, हाच सर्वांत मोठा परतावा आहे. त्यामुळे बोनसनं ही महागडी कर्जे आधी फेडा. मात्र, गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्जावर टॅक्स बेनिफिट मिळत असल्यानं तिथं विचारपूर्वक निर्णय घ्या.

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ₹२,२१० नं स्वस्त झाली चांदी, पटापट चेक करा सोन्याचे दर

बचत की परतावा हवा  

कर्जाचे प्रीपेमेंट केल्यास व्याजात खात्रीशीर बचत होते आणि मानसिक ताण कमी होतो. याउलट, शेअर बाजारात केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा परतावा देऊ शकते; पण त्यात जोखीम असते. जर तुम्हाला मार्केटमधील चढ-उतारांची भीती वाटत असेल, तर कर्ज फेडणं हाच उत्तम पर्याय आहे.

कर्जाचा टप्पा महत्त्वाचा  

गृहकर्जाच्या सुरुवातीच्या वर्षांत केलेली परतफेड व्याजात मोठी बचत करते. जर तुमचं कर्ज संपत आलं असेल, तर मुद्दल कर्जापेक्षा व्याजाचा हिस्सा कमी असतो; अशा वेळी गुंतवणुकीचा पर्याय अधिक फायदेशीर ठरू शकतो. कर्जाच्या सुरुवातीला अधिकाधिक रक्कम प्रीमेमेंट केली तर फायदेशीर ठरते.

सुवर्णमध्य गाठा  

हा निर्णय 'आर या पार' असा नसावा. बोनसचे दोन भाग करा. एक भाग महागड्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरा आणि दुसरा भाग चांगल्या योजनेत गुंतवा. त्यामुळे कर्जाचे ओझेही कमी होईल व संपत्तीही निर्माण होईल. शेवटी, ज्या निर्णयामुळे तुम्हाला शांत झोप लागेल, तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो.

नेमकं काय करावं?  कर्ज वेळेआधी फेडताना बँक किती दंड आकारतेय ते तपासा; दंड जास्त असल्यास गुंतवणूक करणेच फायद्याचं ठरतं. गुंतवणुकीवरील परतावा महागाई आणि कर्जाच्या व्याजदरापेक्षा जास्त असेल, तर पैसे गुंतवणं अधिक तर्कसंगत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Debt repayment or investment? Smart financial decisions explained simply.

Web Summary : Confused about debt vs. investment? Prioritize high-interest debt like credit cards. Consider tax benefits on home/education loans. Balance debt repayment with smart investments for long-term growth, ensuring peace of mind.
टॅग्स :बँकपैसा