Join us

Shark Tank India 2 : 800 कोटींचा बिझनेस प्लॅन; आकडा ऐकून शार्क्स चक्रावले, कोण बाजी मारणार..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 19:54 IST

Shark Tank India 2: शार्क टँक इंडियाच्या सीझन-2 ची दमदार सुरुवात झाली आहे. यात एक कंपनी तब्बल 800 कोटींचे प्रपोजल घेऊन आली आहे.

Shark Tank India 2: शार्क टँक इंडियाच्या सीझन-2 ची दमदार सुरुवात झाली आहे. शो सुरू झाला तेव्हापासून या शोच्या चर्चा आहेत. दरम्यान, सीझन 2 मधील आगामी एपिसोड मोठा धमाका करणारा ठरणार आहे. आगामी एपिसोडमध्ये एक असे बिझनेस प्रपोजल येणार आहे, जे ऐकून सर्वच शार्कला धक्का बसेल. सोशल मीडियावर अपलोड केलेल्या एका प्रोमोमध्ये या बिझनेस प्रपोजलवर शार्क एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

800 कोटींचे इन्व्हेस्टमेंट प्रपोजलइंस्टाग्रामवर एक प्रोमो व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे, ज्यामध्ये पॅराडाइज हेअर कलरचे संस्थापक 65 लाखांच्या गुंतवणुकीची मागणी करताना दिसत आहेत. यासाठी त्यांनी शार्कंना एक टक्के शेअर देऊ केले आहे. केसांच्या रंगाची कल्पना शार्कला इतकी आवडली की प्रत्येकाने कंपनीच्या संस्थापकांसमोर स्वतःची वेगळी डील ठेवली आहे. पुढे काय होणार, ही डील कोण मारणार? हे पाहणे नक्कीच रंजक असेल.

नफा ऐकून धक्का बसलाटेम्पररी हेअर कलर करणाऱ्या तरुणीची पीच इतकी हटके होती की, प्रत्येक शार्क स्वतःला रोखू शकले नाही. त्यांनी दिलेल्या योजनेमुळे गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळेल. पीयूष बन्सल यांनी प्लॅन ऐकल्यानंतर विचारले की, योजना कितीची आहे? त्याला पॅराडाईज फाऊंडर्सनी उत्तर दिले- 800 कोटी. कंपनीच्या फाउंडर्सचे उत्तर ऐकून सर्वजण चक्रावले. 

यानंतर विनीताने 4% इक्विटीसाठी 65 लाख रुपये, अमनने 5% साठी 65 लाख रुपये ऑफर दिली. या सर्वांना मागे टाकत पियुषने 1% वर 65 लाख रुपयांची ऑफर दिली. आता ही कंपनी कोणत्या शार्कची ऑफर स्विकारते, हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

टॅग्स :व्यवसायटेलिव्हिजनगुंतवणूक