Join us

'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:00 IST

World Senior Citizens Day : ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वृद्धांसाठी असलेल्या गुंतवणूक योजनेबद्दल जाणून घ्या. बँकेच्या बचत ठेवीपेक्षा जास्त व्याज देते.

World Senior Citizens Day : दरवर्षी २१ ऑगस्ट हा दिवस 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन' म्हणून साजरा केला जातो. निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि चिंतामुक्त असावे, अशी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाची इच्छा असते. यासाठी असे अनेक गुंतवणूक पर्याय आहेत, जे चांगले व्याज देतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित असतात. यापैकीच एक उत्तम पर्याय म्हणजे टपाल कार्यालयाची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) होय.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या एसबीआयमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजापेक्षा या योजनेत अधिक व्याज मिळते. या योजनेत तुम्ही फक्त ५ वर्षांत १२,३०,००० रुपयांचे व्याज मिळवू शकता.

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत मिळणारे व्याजटपाल कार्यालयाच्या या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ८.२% दराने व्याज मिळते. केवळ जास्त व्याजदरच नाही, तर या योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम ८०-सी अंतर्गत कर सवलतीचा लाभही मिळतो, ज्यामुळे कर बचतही होते.

गुंतवणुकीची मर्यादा आणि कालावधीया योजनेत कोणताही ज्येष्ठ नागरिक १००० रुपयांपासून ते ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. या योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असतो. ५ वर्षांनंतर, जेव्हा तुमची रक्कम परिपक्व होते, तेव्हा तुम्ही ती पुढील ३ वर्षांसाठी वाढवू शकता. मात्र, यासाठी तुम्ही योजनेची मुदत संपल्यानंतर एका वर्षाच्या आतच अर्ज करणे आवश्यक आहे.

वाचा - UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार

५ वर्षांत १२.३० लाखांचा व्याज कसे मिळणार?जर तुम्ही या योजनेत ३० लाख रुपये जमा केले, तर ८.२% दराने तुम्हाला ५ वर्षांसाठी १२,३०,००० रुपये इतके व्याज मिळेल. याचा अर्थ, ५ वर्षांच्या मुदतीनंतर तुम्हाला एकूण ४२,३०,००० रुपये मिळतील.

योजनेसाठी पात्रताया योजनेत कोणताही ज्येष्ठ नागरिक, ज्याचे वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, गुंतवणूक करू शकतो. काही विशिष्ट परिस्थितीत वयाच्या मर्यादेत सूट मिळते. यामध्ये, स्वेच्छानिवृत्ती घेणारे सरकारी कर्मचारी किंवा संरक्षण दलातून निवृत्त झालेले लोक यांचा समावेश होतो.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकज्येष्ठ नागरिकबँकिंग क्षेत्रबँक