SCSS Investment Limit: निवृत्तीनंतर पैशांची चिंता न करता आयुष्य जगण्यासाठी ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) हा एक उत्तम पर्याय आहे. ही जोखीम नसलेली आणि सरकारी हमी असलेली गुंतवणूक योजना असून ती कर बचतीसोबतच उत्तम परतावा देखील देते. ही योजना ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा ५५ ते ६० वयोगटातील ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती (VRS) घेतली आहे अशा लोकांसाठी उपलब्ध आहे. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख रुपयांपर्यंत एकरकमी गुंतवणूक करू शकता. सध्या या योजनेवर वार्षिक ८.२ टक्के दरानं व्याज मिळत असून ही सुविधा देशातील सर्व पोस्ट ऑफिस आणि निवडक बँकांमध्ये उपलब्ध आहे.
गुंतवणुकीवर किती मिळणार परतावा?
जर तुम्ही या योजनेत १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर सध्याच्या ८.२ टक्के व्याजदरानुसार तुम्हाला दरमहा सुमारे १०,२५० रुपये व्याज मिळू शकतं. तसेच, जर तुम्ही ३० लाख रुपयांची कमाल मर्यादा असलेली रक्कम गुंतवली, तर तुमची मासिक कमाई २०,५०० रुपयांपर्यंत होऊ शकते. या योजनेचा लॉक-इन कालावधी ५ वर्षांचा आहे, मात्र गरज भासल्यास तो पुढे वाढवण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. पीपीएफ (PPF) किंवा एनएससी (NSC) सारख्या इतर योजनांच्या तुलनेत यामध्ये गरजेच्या वेळी पैसे काढण्याची सोय अधिक चांगली आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचण भासत नाही.
कर बचत आणि टीडीएसचे नियम
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. यामुळे ३० टक्के टॅक्स स्लॅबमध्ये येणाऱ्या व्यक्तीची वर्षाला सुमारे ४५,००० रुपयांची बचत होऊ शकते. जर वार्षिक व्याज ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर १० टक्के टीडीएस (TDS) कापला जातो, परंतु ज्येष्ठ नागरिकांना कलम ८०टीटीबी (80TTB) अंतर्गत ५०,००० रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त आहे. कर वजा करूनही या योजनेचा परतावा इतर अनेक पर्यायांपेक्षा चांगला मानला जातो.
पात्रता आणि खातं उघडण्याची प्रक्रिया
या योजनेत ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे लोक गुंतवणूक करू शकतात. ५५ ते ६० वयोगटातील ज्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे ते देखील यात गुंतवणूक करू शकतात, परंतु त्याचे पूर्ण लाभ वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावरच मिळतात. यात वैयक्तिक किंवा पती-पत्नी मिळून संयुक्त खातं उघडता येतं, मात्र अनिवासी भारतीयांना (NRIs) यात गुंतवणूक करण्याची परवानगी नाही. खातं उघडण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन विहित फॉर्म भरावा लागतो. यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो आणि गुंतवणुकीचा पुरावा म्हणून केवायसी कागदपत्रे जमा करावी लागतात. गुंतवणुकीची रक्कम चेक किंवा ऑनलाइन ट्रान्सफरद्वारे भरता येते आणि त्यानंतर ७ ते १५ दिवसांत खातं सक्रिय होतं.
Web Summary : Senior Citizen Savings Scheme (SCSS) offers tax benefits and monthly income. Invest up to ₹30 lakhs for 8.2% interest. Those above 60 years or VRS retirees (55-60) are eligible. Get ₹10,250 monthly on ₹15 lakh investment and ₹20,500 on ₹30 lakh. Tax exemption up to ₹1.5 lakhs under section 80C.
Web Summary : वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) टैक्स लाभ और मासिक आय प्रदान करती है। 8.2% ब्याज के लिए ₹30 लाख तक निवेश करें। 60 वर्ष से अधिक या वीआरएस सेवानिवृत्त (55-60) पात्र हैं। ₹15 लाख के निवेश पर ₹10,250 और ₹30 लाख पर ₹20,500 मासिक प्राप्त करें। धारा 80C के तहत ₹1.5 लाख तक की कर छूट।