Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकदाच गुंतवणूक करुन दरमहा ११,००० रुपये 'पेन्शन' मिळवा; SBI ची ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 10:28 IST

SBI Annuity Deposit Scheme : आज आम्ही तुम्हाला अशाच एका सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही एकरकमी गुंतवणूक करून व्याजाच्या माध्यमातून मासिक उत्पन्न मिळवू शकता.

SBI Annuity Deposit Scheme : जर तुम्ही तुमच्या कष्टाचे पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवून त्यातून दरमहा निश्चित उत्पन्न मिळवण्याच्या विचारात असाल, तर भारतीय स्टेट बँकेची एक विशेष योजना तुमच्यासाठी गेमचेंजर ठरू शकते. शेअर बाजारातील अस्थिरतेपासून दूर आणि सरकारी सुरक्षेसह दरमहा कमाईची संधी देणाऱ्या या योजनेचे नाव आहे, 'एसबीआय ॲन्युइटी डिपॉझिट स्कीम'.

काय आहे ही योजना?एसबीआयची ही योजना एका मुदत ठेव सारखीच आहे, पण यात एक महत्त्वाचा फरक आहे. एफडीमध्ये तुम्हाला व्याजाची रक्कम मिळते आणि मुदतीनंतर मुद्दल परत मिळते. मात्र, ॲन्युइटी स्कीममध्ये तुम्ही जमा केलेली एकरकमी रक्कम आणि त्यावरील व्याज अशा दोन्ही गोष्टी मिळून तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम दिली जाते.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

  • कमीतकमी गुंतवणूक : तुम्ही किमान १,००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.
  • जास्तीत जास्त मर्यादा : गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.
  • कालावधी : ३ वर्षे, ५ वर्षे, ७ वर्षे किंवा १० वर्षे यांपैकी कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता.
  • व्याजदर : या योजनेचा व्याजदर हा बँकेच्या मुदत ठेवीइतकाच असतो. ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का (०.५०%) अतिरिक्त व्याज मिळते.

१० लाखांच्या गुंतवणुकीवर किती मिळेल परतावा?

  • समजा, तुम्ही या योजनेत १० लाख रुपये १० वर्षांसाठी गुंतवले, तर त्याचे गणित खालीलप्रमाणे असेल.
  • दरमहा उत्पन्न : सुमारे ११,३५४ रुपये.
  • कालावधी : पुढील १२० महिने (१० वर्षे) तुम्हाला ही रक्कम मिळत राहील.
  • एकूण परतावा : १० वर्षांच्या शेवटी तुमच्या हातात एकूण १३.६२ लाख रुपये पडलेले असतील. 
  • (टीप: हा परतावा अंदाजित व्याजदरांवर आधारित आहे, बँकेच्या बदलत्या धोरणानुसार यात अल्प बदल होऊ शकतो.)

वाचा - कोण आहेत अतनु चक्रवर्ती? आधी IAS अधिकारी, त्यानंतर बँकिंग विश्वात एन्ट्री; आता तडकाफडकी HDFC का सोडली?

तात्काळ पैशांची गरज भासल्यास 'लोन'ची सुविधाया योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, जर तुम्हाला गुंतवणुकीच्या काळात अचानक पैशांची गरज भासली, तर तुम्ही तुमच्या जमा रकमेच्या ७५ टक्क्यांपर्यंत कर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधा घेऊ शकता. यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते आणि तातडीच्या वेळी रोख रकमेची अडचणही भासत नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : SBI Annuity Scheme: Invest Once, Get ₹11,000 Monthly Pension!

Web Summary : SBI's Annuity Deposit Scheme offers senior citizens a secure, fixed monthly income. Invest a lump sum; get monthly payments covering principal and interest. With flexible tenures and loan options, it's ideal for stable returns. A ₹10 lakh investment yields approximately ₹11,354 monthly for 10 years.
टॅग्स :निवृत्ती वेतनस्टेट बँक आॅफ इंडियागुंतवणूकपैसा