Salary Management : महिन्याची १ तारीख झाली की पगार झाल्याचा आनंद गगनात मावेनासा असतो, पण २० तारीख येता येता बँक बॅलन्स पाहून कपाळावर आठ्या येतात, अशी स्थिती आजच्या अनेक नोकरदारांची आहे. ऑनलाईन शॉपिंग, फूड डिलिव्हरी आणि डिजिटल पेमेंटच्या युगात पैसे खर्च करणे जितके सोपे झाले आहे, तितकेच ते वाचवणे कठीण! मात्र, थोडे आर्थिक शिस्त आणि नियोजन केल्यास तुम्ही महिन्याच्या शेवटीही खिसा गरम ठेवू शकता.
प्रत्येक रुपयाचा हिशोब मांडानेमका पैसा कुठे खर्च होतोय, हे समजण्यासाठी प्रत्येक खर्चाची नोंद ठेवा. एखादे 'बजेट ॲप' वापरा किंवा डायरीमध्ये रोजचे खर्च लिहा. जेव्हा तुम्हाला दिसेल की हॉटेलिंग, कॅब किंवा अनावश्यक शॉपिंगवर किती पैसे जात आहेत, तेव्हा वायफळ खर्च रोखणे सोपे होईल.
५०-३०-२० सूत्र वापरा
- आर्थिक नियोजनासाठी हा जागतिक स्तरावर लोकप्रिय नियम आहे.
- ५०% : जीवनावश्यक गरजा (घरभाडे, वीज बिल, रेशन).
- ३०% : तुमच्या इच्छा (फिरणे, मनोरंजन, हॉटेलिंग).
- २०% : बचत आणि गुंतवणूक.
- सुरुवात किमान १०% बचतीने करा, पण ती दरमहा नियमित असावी.
'होम कुक्ड' फूड: आरोग्यासोबत खिशाचीही बचत
आजकाल ॲपवरून जेवण मागवणे सोपे वाटते, पण हा खर्च महिन्याच्या बजेटवर मोठा ताण देतो. बाहेरचे खाणे आठवड्यातून १-२ दिवसांवर मर्यादित ठेवून घरच्या जेवणाला प्राधान्य दिल्यास महिन्याकाठी हजारो रुपयांची बचत होऊ शकते.
क्रेडिट कार्ड आणि सबस्क्रिप्शनवर नियंत्रण
- कर्जाचा सापळा : 'Buy Now Pay Later' किंवा क्रेडिट कार्डचा अतिवापर टाळा. वेळेवर बिल भरले नाही, तर व्याजाचा दर तुमच्या बचतीला सुरुंग लावतो.
- अनावश्यक सदस्यत्व : ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा जिमचे सबस्क्रिप्शनचा विचार करा. ज्यांचा वापर होत नाही, ते त्वरित रद्द करा. २००-३०० रुपयांचे छोटे वाटणारे हे खर्च वर्षाकाठी मोठे ठरतात.
वाचा - AI चिपच्या किमतीत येईल अलिशान फ्लॅट! रिलायन्स-टाटासारख्या कंपन्यांची मोठी भागीदारी
'इमर्जन्सी फंड' आणि २४ तासांचा नियमदरमहा किमान ५०० ते १००० रुपये एका वेगळ्या खात्यात ठेवा. अचानक येणाऱ्या वैद्यकीय खर्चावेळी हे पैसे धावून येतील.कोणतीही चैनीची वस्तू खरेदी करण्यापूर्वी स्वतःला २४ तास द्या. अनेकदा एका दिवसानंतर ती वस्तू घेण्याची तीव्र इच्छा कमी होते, ज्यामुळे तुमची अनावश्यक खरेदी टळते.
Web Summary : Track expenses, use the 50-30-20 rule (needs, wants, savings), prioritize home-cooked meals, control credit card use, cancel unused subscriptions, build an emergency fund, and implement a 24-hour waiting period for non-essential purchases to improve financial health.
Web Summary : खर्चों पर नज़र रखें, 50-30-20 नियम (ज़रूरतें, इच्छाएँ, बचत) का इस्तेमाल करें, घर के बने भोजन को प्राथमिकता दें, क्रेडिट कार्ड के उपयोग को नियंत्रित करें, बेकार सब्सक्रिप्शन रद्द करें, एक आपातकालीन निधि बनाएँ, और गैर-ज़रूरी खरीदारी के लिए 24 घंटे का इंतज़ार करें।