Reliance Industries Highest Salary Employee: रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांची कंपनी ही भारतातील सर्वात मोठ्या आणि मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचा व्यवसाय अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला असून, पत्नी नीता अंबानी आणि मुले इशा, आकाश आणि अनंत कंपनीच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, इतक्या मोठ्या साम्राज्यात सर्वाधिक पगार घेणारी व्यक्ती अंबानी कुटुंबातील नाही.
रिलायन्समध्ये सर्वाधिक पगार कोणाचा?
निखील मेसवानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजमधील सर्वाधिक पगार घेणारे अधिकारी आहेत. त्यांचा वार्षिक पगार ₹२४ कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते. कंपनीच्या ऑपरेशन्समध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
अंबानी कुटुंबाशी जुना संबंध
निखिल मेसवानी अंबानी कुटुंबातील सदस्य नसले, तरी त्यांचे कुटुंब अनेक दशकांपासून रिलायन्ससोबत जोडलेले आहे. त्यांचे वडील रसीकभाई मेसवानी हे कंपनीच्या सुरुवातीच्या काळातील महत्त्वाचे संचालक होते आणि धीरुभाई अंबानी यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते.
कंपनीच्या वाढीत मोठा वाटा
रसिकभाई मेसवानी यांनी रिलायन्सच्या सुरुवातीच्या टप्प्यात, विशेषतः पॉलिएस्टर व्यवसाय उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे मेसवानी कुटुंबाचा रिलायन्सच्या वाढीत मोठा वाटा मानला जातो.
करिअरची सुरुवात आणि प्रवास
निखिल मेसवानी यांनी १९८६ मध्ये प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून रिलायन्समध्ये प्रवेश केला. १ जुलै १९८८ पासून ते कंपनीच्या बोर्डवर Whole-time Director आणि Executive Director म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा कंपनीतील प्रवास सातत्याने प्रगती करणारा राहिला आहे.
स्पोर्ट्स क्षेत्रातही सक्रिय भूमिका
निखिल मेसवानी हे रिलायन्सच्या स्पोर्ट्स उपक्रमांशीही संबंधित आहेत. त्यामध्ये Mumbai Indians (IPL टीम), Indian Super League संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे.
Web Summary : Nikhil Meswani, not an Ambani, is Reliance's highest-paid executive, earning over ₹24 crore annually. His family has long ties to Reliance, with his father being a close associate of Dhirubhai Ambani. Meswani joined Reliance in 1986 and is involved in its sports ventures, including Mumbai Indians.
Web Summary : अंबानी नहीं, निखिल मेसवानी रिलायंस के सबसे ज्यादा वेतन पाने वाले कार्यकारी हैं, जिनकी वार्षिक आय ₹24 करोड़ से अधिक है। उनके परिवार का रिलायंस से लंबे समय से संबंध है, उनके पिता धीरूभाई अंबानी के करीबी सहयोगी थे। मेसवानी 1986 में रिलायंस में शामिल हुए और मुंबई इंडियंस सहित इसके खेल उद्यमों में शामिल हैं।