Join us

PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:58 IST

PPF Vs NPS Investment: जर तुम्ही निवृत्ती किंवा दीर्घकालीन बचतीसाठी नियोजन करत असाल, तर दोन पर्याय सर्वाधिक लोकप्रिय आहेत एनपीएस (नॅशनल पेन्शन सिस्टम) आणि पीपीएफ. दोन्हीमुळे कर बचत होते.

PPF Vs NPS Investment: जर तुम्ही निवृत्ती किंवा दीर्घकालीन बचतीसाठी नियोजन करत असाल, तर दोन पर्याय सर्वाधिक लोकप्रिय आहेत एनपीएस (नॅशनल पेन्शन सिस्टम) आणि पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड). दोन्हीमुळे कर बचत होते आणि संपत्ती वाढते; पण दोन्हींची कार्यपद्धती वेगळी आहे.

पीपीएफ म्हणजे स्थिर व्याजदरासह खात्रीशीर बचत खातं, तर एनपीएस म्हणजे इक्विटी आणि कर्ज यांचे मिश्रण असलेला लवचिक म्युच्युअल फंड. २०-३० वयोगटातील गुंतवणूकदारांसाठी एनपीएस उत्तम आहे. कारण, यात दीर्घकालीन इक्विटी वाढीचा लाभ मिळतो; पण ४० वर्षावरील गुंतवणूकदारांना स्थिरता हवी असल्यास पीपीएफ अधिक योग्य ठरते.

कर वसुली आणि परतावा

पीपीएफमध्ये ८०सी अंतर्गत कर सवलत मिळते आणि व्याज व परिपक्चतेवरील रक्कम करमुक्त असते. एनपीएसमध्येही ८०सी सूट मिळते.

परताव्याच्या वेळी ६० टक्के रक्कम करमुक्त असते आणि उर्वरित ४० टक्के अॅन्युइटीत गुंतवावी लागते. ती उत्पन्न म्हणून करपात्र असते.

निष्कर्ष: पीपीएफ आणि एनपीएस हे प्रतिस्पर्धी नाहीत, तर एकमेकांना पूरक आहेत. एक तुमचे भांडवल सुरक्षित ठेवते, तर दुसरी ते वाढवते.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : PPF or NPS: Where to invest for long-term savings?

Web Summary : PPF offers guaranteed returns, while NPS blends equity and debt for potentially higher growth. NPS suits younger investors seeking long-term gains; PPF is better for older investors preferring stability and tax benefits. Both complement each other.
टॅग्स :गुंतवणूकपीपीएफपैसा