Join us

Post Office दमदार योजना; फक्त एकदा पैसे गुंतवा अन् १० लाख रुपयांचा फायदा मिळवा..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:13 IST

Post Office Scheme: आज बाजारात गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, सरकारी योजनांमध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात.

Post Office Scheme: आज बाजारात गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, सरकारी योजनांमध्ये तुमचे पैसे सुरक्षित राहतात. तुम्हालाही तुमचे पैसे अशा ठिकाणी गुंतवायचे असतील जिथे सुरक्षिततेसोबतच चांगला परतावा मिळेल, तर पोस्ट ऑफिसचीगुंतवणूक योजना हा एक सुरक्षित पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका उत्तम योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेत तुम्ही फक्त एकदाच पैसे गुंतवून १० लाख रुपयांचा थेट नफा (गुंतवणुकीव्यतिरिक्त) मिळवू शकता.

आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये फक्त एकरकमी ५ लाख रुपये गुंतवून तुम्ही १५ लाख रुपये, म्हणजेच १० लाख रुपयांचा नफा मिळवू शकता, तेही कोणत्याही जोखीमशिवाय...

काय आहे योजना ?ही पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना आहे, ज्याला सामान्य भाषेत पोस्ट ऑफिस एफडी असेही म्हणतात. यामध्ये तुम्ही दरवर्षी एकरकमी रक्कम जमा करता आणि त्यावर व्याज मिळते. या योजनेतील सर्वात खास गोष्ट म्हणजे, ही एक सरकारी योजना आहे, त्यामुळे त्यात पैसे बुडण्याचा धोका नाही. सध्या पोस्ट ऑफिस ५ वर्षांच्या मुदत ठेवीवर ७.५% वार्षिक व्याज देत आहे, जे अनेक बँकांपेक्षा जास्त आहे.

५ लाखांचे १५ लाख कसे होतील?तुम्ही आज ५ वर्षांसाठी पोस्ट ऑफिस एफडीमध्ये एकरकमी ५ लाख गुंतवले तर तुम्हाला वार्षिक ७.५% दराने व्याज मिळेल. ५ वर्षांनंतर तुमची गुंतवणूक सुमारे ७,२४,९७४ रुपये होईल, परंतु येथे थांबू नका. हे पैसे पुन्हा त्याच योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवा आणि पुढील ५ वर्षांत ही रक्कम आणखी वाढून १०,५१,१७५ रुपये होईल. आता पुन्हा एकदा ५ वर्षांसाठी ती जमा करा. यावेळी ही रक्कम सुमारे १५,२४,१४९ रुपये होईल. म्हणजेच, तुमची सुरुवातीची ५ लाखांची रक्कम आता १५ वर्षांत तिप्पट झाली आहे. याचा अर्थ, तुम्हाला १० लाख रुपयांचा थेट नफा होईल.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूकव्यवसाय