Join us

Post Office Scheme: ५ लाखांची गुंतवणूक बनेल ₹१०,५१,१७५; करावं लागेल फक्त इतकं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 13:29 IST

Post Office Scheme: बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसही गुंतवणूकीचे अनेक पर्याय देत असते. पोस्टाच्या या स्कीममध्ये तुमचे पैसे दुप्पट होती. यात तुम्हाला हमी परतावाही मिळतो.

Post Office Time Deposit: साधारणपणे जोखीममुक्त गुंतवणूकीकडे वळणारे लोक अनेकदा बँकेत एफडी करतात, परंतु जर तुम्हाला दीर्घ मुदतीची एफडी करायची असेल तर पोस्ट ऑफिसमध्येगुंतवणूकीचा पर्याय तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतो. पोस्ट ऑफिसची एफडी, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (Post Office TD) म्हणून ओळखली जाते. येथे तुम्हाला १, २, ३ आणि ५ वर्षांचे एफडीचे पर्याय मिळतील. या सर्वांवर वेगवेगळे व्याजदर दिले जातात.  

परंतु पोस्ट ऑफिसच्या ५ वर्षांच्या टॅक्स फ्री एफडीवर चांगलं व्याज मिळतं. जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले तर ते काही वर्षांत दुप्पट होऊ शकते. पोस्ट ऑफिस एफडीचे व्याजदर काय आहेत आणि याद्वारे तुम्ही दुप्पट रक्कम कशी मिळवू शकता ते आपण जाणून घेऊ. 

किती आहे व्याजदर? 

एका वर्षाच्या खात्यावर - ६.९% वार्षिक व्याजदोन वर्षांच्या खात्यावर - ७.०% वार्षिक व्याजतीन वर्षांच्या खात्यावर - ७.१% वार्षिक व्याजपाच वर्षांच्या खात्यावर व्याज – ७.५% वार्षिक व्याज 

दुप्पट होतील पैसे 

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट तुमची गुंतवलेली रक्कम दुप्पट करू शकते, परंतु यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. तुम्हाला आधी ५ वर्षांसाठी ५ लाख रुपयांची एफडी करावी लागेल. पण ५ वर्षांनंतर तुम्हाला पुढील ५ वर्षांसाठी पुन्हा ही रक्कम गुंतवावी लागेल. अशा प्रकारे तुमच्या एफडीचा कालावधी १० वर्षे असेल.  

५ लाखांच्या गुंतवणूकीवर मिळतील १०,५१,१७५ 

जेव्हा तुम्ही पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये ५ वर्षांसाठी ५ लाख रुपये जमा करता, तेव्हा पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला ७.५ टक्के व्याज दरानं २,२४,९७४ रुपये व्याज म्हणून मिळतील. म्हणजे ५ वर्षांनंतर तुम्हाला एकूण ७,२४,९७४ रुपये मिळेल. परंतु जेव्हा तुम्ही ही रक्कम पुढील ५ वर्षांसाठी पुन्हा गुंतवाल, तेव्हा ७.५ टक्के व्याजदरानं तुम्हाला ३,२५,२०१ रुपये व्याज म्हणून मिळतील. ७,२४,९७४ + ३,२६,२०१ रुपये मिळून एकूण १०,५१,१७५ रुपये मॅच्युरिटीवर तुम्हाला मिळतील.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक