Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी गॅरंटीसह दरमहा मिळेल ₹९,२५० चे व्याज; किती गुंतवणूक करावी लागेल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 18:03 IST

Post Office Saving Schemes: तुम्ही गुंतवणूकीचा सुरक्षित पर्याय शोधत असाल, तर ही योजना तुमच्यासाठीच आहे.

Post Office Saving Schemes:  गुंतवणूकीतून बंपर कमाई करण्याचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही जोखीम घेण्यास तयार असाल तर शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातून मोठी कमाई होऊ शकते, पण त्यात तितकाच तोटा होण्याचाही धोका असतो. परंतु, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जोखीम न घेता सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसची एक जबरदस्त योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

या सरकारी योजनेच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही चिंतेविना दरमहा घरात बसून ९,२५० रुपयांची निश्चित कमाई करू शकता. विशेष म्हणजे, या व्याजाची सर्व रक्कम थेट तुमच्या बचत खात्यात जमा होत राहील.

'झिरो-रिस्क' अन् फिक्स व्याज

भारतीय टपाल विभाग नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक प्रकारच्या बचत योजना राबवत असतो. यापैकीच एक अत्यंत लोकप्रिय योजना म्हणजे 'पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम' आहे. सध्या या योजनेवर वार्षिक ७.४ टक्के दराने व्याज मिळत आहे. 

ही योजना पूर्णपणे 'रिस्क-फ्री' असून याला सरकारची १०० टक्के हमी आहे. या योजनेत तुम्हाला फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर पुढील ५ वर्षांपर्यंत तुम्हाला दरमहा फिक्स व्याज मिळत राहते.

किती गुंतवणूक करावी लागेल ?

पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीम अंतर्गत तुम्ही सिंगल अकाउंट किंवा जॉइंट अकाउंट देखील उघडू शकता. या योजनेत सिंगल अकाउंट असेल तर कमाल ९ लाख रुपये गुंतवता येतात, तर जॉइंट अकाउंटमध्ये कमाल १५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.

९,२५० रुपये दरमहा कसे मिळतील?

जर तुम्ही तुमच्या पत्नीसोबत किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यासोबत मिळून जॉइंट अकाउंट उघडले आणि त्यात १५ लाख रुपये गुंतवले, तर ७.४ टक्के व्याजदरानुसार तुम्हाला दरमहा ९,२५० रुपये फिक्स व्याज मिळणे सुरू होईल.

५ वर्षांनंतर मूळ रक्कम सुरक्षित

पोस्ट ऑफिसची ही एमआयएस योजना ५ वर्षांनी मॅच्युर होते. ५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही गुंतवलेली संपूर्ण मूळ रक्कम (उदा. १५ लाख रुपये) तुम्हाला जशीच्या तशी परत केली जाते. तुम्ही ती रक्कम पुन्हा पुढील ५ वर्षांसाठी गुंतवू शकता किंवा काढून घेऊ शकता. नियमित मासिक उत्पन्नाचा स्रोत शोधणाऱ्यांसाठी, विशेषतः सेवानिवृत्त व्यक्तींसाठी, सुरक्षितता आणि चांगल्या परताव्याचा हा एक उत्तम मेळ आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Post Office Scheme: Earn ₹9,250 Monthly with Government Guarantee.

Web Summary : Invest in the Post Office Monthly Income Scheme for guaranteed monthly income. A ₹15 lakh investment in a joint account yields ₹9,250 monthly at 7.4% interest. The principal is returned after 5 years, offering retirees security and good returns.
टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक