Post Office Scheme: कोणतेही आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चांगल्या रकमेची आवश्यकता असते. घर खरेदी करायचं असो किंवा गाडी विकत घ्यायची असेल, या सगळ्यांना मोठा पैसा आवश्यक असतो, जो फक्त पगारातून जमू शकणार नाही. अशावेळी काही लोक भविष्यातील आपलं ध्येय साध्य करण्यासाठी म्युच्युअल फंडाच्या एसआयपीचा आधार घेतात.
त्याचबरोबर काही लोकांना असंही वाटतं की, रिस्क घेऊन मोठे पैसे मिळवायचं नाही. अशा लोकांसाठी सरकारी योजना उपयुक्त ठरू शकतात. अशाच एका योजनेबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत, जी पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम अंतर्गत चालवली जाते. आपण आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये ती उघडू शकता. ज्या योजनेबद्दल आम्ही बोलत आहोत, ती तुम्हाला फक्त व्याजातून मोठे पैसे कमवू शकते. जर तुम्ही यात पाच वर्षे गुंतवणूक केली तर केवळ व्याजातून तुम्ही ८२ हजार रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहे ही स्कीम.
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
जबरदस्त आहे पोस्टाची स्कीम
आपण ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS). या योजनेअंतर्गत, तुम्ही एकरकमी रक्कम जमा करून मोठी कमाई करू शकता. ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही सरकार समर्थित योजना आहे. ती विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. म्हणजेच तुम्ही ही योजना तुमच्या वडिलांना किंवा आजोबांना भेट म्हणून देऊ शकता.
ही योजना ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी खुली आहे. या योजनेसाठी किमान गुंतवणूक १००० रुपये आणि कमाल गुंतवणूक मर्यादा ३० लाख रुपये आहे. या योजनेअंतर्गत मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांसाठी आहे, परंतु तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही तो आणखी ३ वर्षांसाठी वाढवू शकता. व्याजाबद्दल बोलायचं झालं तर, या योजनेअंतर्गत ८.२ टक्के व्याज दिलं जातं. त्याचे व्याजदर तिमाही आधारावर निश्चित केले जाते आणि वार्षिक आधारावर व्याज दिलं जातं. या योजनेंतर्गत ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांची वार्षिक सूटही मिळते.
कशी होईल ८२ हजारांची कमाई
जर कोणी या योजनेत २,००,००० रुपये एकरकमी गुंतवले तर त्याला ५ वर्षे मुदतपूर्ती झाल्यानंतर ८.२ टक्के व्याजदराने मोठी रक्कम मिळेल. गणनेनुसार, त्याला केवळ व्याजातून ₹८२,००० मिळतील आणि मुदतपूर्तीनंतर एकूण रक्कम ₹२,८२,००० होईल. तिमाही आधारावर व्याजाद्वारे मिळणारं उत्पन्न ₹४,०९९ असेल.