Post Office RD Scheme: सुरक्षित आणि स्थिर परतावा मिळवण्यासाठी अनेक गुंतवणूकदार आजही पारंपरिक पर्यायांवर भर देतात. फिक्स्ड डिपॉझिट (FD) प्रमाणेच कमी जोखमीची आणि निश्चित परतावा देणारी योजना म्हणून पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना गुंतवणूकदारांचे लक्ष वेधत आहे. नियमित आणि छोट्या गुंतवणुकीतून मोठा निधी उभारण्याचा हा एक प्रभावी पर्याय मानला जातो.
छोट्या बचतीतून मोठा निधी उभारा...
आर्थिक शिस्त आणि नियमित बचतीच्या सवयीमुळे दीर्घकालीन मोठा फंड तयार होऊ शकतो. दररोज सुमारे ₹३०० अन् महिन्याला ₹९,००० गुंतवणूक केल्यास, भविष्यात मोठा निधी उभा राहू शकतो.
दहा वर्षांत १५ लाखांहून अधिकचा फंड
उदा-
मासिक गुंतवणूक: ₹९,०००कालावधी: १० वर्षेएकूण गुंतवणूक: ₹१०.८० लाख
सध्याच्या अंदाजे ६.७% व्याजदरानुसार, मॅच्युरिटीवेळी मिळणारी रक्कम: सुमारे ₹१५.३७ लाखएकूण नफा: अंदाजे ₹४.५७ लाख
गुंतवणुकीचा कालावधी आणि लवचिकता
पोस्ट ऑफिस RD योजना साधारणतः ५ वर्षांसाठी असते. मात्र, गुंतवणूकदारांना ती पुढे वाढवण्याचीही सुविधा मिळते. जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास अधिक चांगला परतावा मिळू शकतो.
अगदी कमी रकमेपासून सुरुवात शक्य
ही योजना लहान गुंतवणूकदारांसाठी विशेष फायदेशीर आहे. केवळ ₹१०० प्रति महिना पासून गुंतवणूक सुरू करता येते. निश्चित व्याजदरामुळे यातून मिळणारा परतावा स्थिर राहतो. महत्वाचे म्हणजे, ही सरकारी योजना असल्यामुळे तुमचे पैसे एकदम सुरक्षित राहतात.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Post Office RD offers safe, fixed returns. Invest ₹9,000 monthly for ten years and potentially get ₹15.37 lakhs at maturity with current interest rates. Start with just ₹100.
Web Summary : पोस्ट ऑफिस आरडी सुरक्षित, निश्चित रिटर्न प्रदान करता है। दस वर्षों के लिए ₹9,000 मासिक निवेश करें और संभावित रूप से परिपक्वता पर वर्तमान ब्याज दरों के साथ ₹15.37 लाख प्राप्त करें। केवल ₹100 से शुरुआत करें।