Join us

Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 08:57 IST

Post Office Investment Scheme: तुम्ही जर सुरक्षित गुंतवणुकीसह कर बचत करू इच्छित असाल आणि दीर्घकाळात चांगली कमाई वाढवू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची ही योजना अतिशय उत्तम आहे.

Post Office Investment Scheme: तुम्ही जर सुरक्षित गुंतवणुकीसह कर बचत करू इच्छित असाल आणि दीर्घकाळात चांगली कमाई वाढवू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजना एक उत्तम पर्याय आहे. ही योजना भारतीय टपाल विभागामार्फत चालवली जाते, जी गुंतवणूकदारांना निश्चित व्याजदरासह दीर्घकाळ गुंतवणुकीचा पर्याय देते. यात तुमची जमा केलेली रक्कम सुरक्षित राहते आणि चांगले परतावा मिळण्याची खात्री असते.

पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • गुंतवणुकीचा कालावधी: ५ वर्षे.
  • व्याजदर: सरकारद्वारे वेळोवेळी निश्चित केला जातो, जो वार्षिक चक्रवाढ पद्धतीनं दिला जातो.
  • व्याज जमा होण्याचा प्रकार: व्याज मुदत पूर्ण झाल्यावर मिळतं, परंतु त्याचा लाभ कर बचतीसाठी गुंतवणुकीच्या कालावधीत मिळतो.
  • कर लाभ: या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत कर सवलत मिळते, ज्यामुळे तुमची कर बचत होते.
  • पुनर्गुंतवणूक: मिळालेल्या व्याजाची पुन्हा गुंतवणूक (Reinvest) करता येते.
  • कर्जाची सुविधा: गुंतवलेल्या रकमेवर कर्जही घेता येते.
  • सुरक्षितता: ही योजना पूर्णपणे सरकारद्वारे चालवली जात असल्यानं तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे.
  • खातं उघडण्याची प्रक्रिया: जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा ऑनलाइन अर्ज करून खातं उघडता येतं. 

गुंतवणुकीची रक्कम आणि व्याजदर

पोस्ट ऑफिसच्या या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत तुम्ही किमान १००० रुपये आणि त्यानंतर १० च्या पटीत कितीही रक्कम गुंतवू शकता. म्हणजेच, या योजनेत गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही.

₹४,००,००० च्या गुंतवणुकीवर ₹१,७९,६१३.५२ परतावा

या योजनेत जर तुम्ही ₹४,००,००० गुंतवले, तर ५ वर्षांनंतर ७.७ टक्के वार्षिक व्याजदरानं तुम्हाला हमखास ₹१,७९,६१३.५२ व्याज मिळेल. अशा प्रकारे, ५ वर्षांनंतर तुमच्याकडे एकूण ₹५,७९,६१३.५२ चा निधी तयार होईल.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक