Join us

Post Office : म्हातारपणी कसलंही टेन्शन नाही, महिन्याला मिळेल ₹५५०० इन्कम; पाहा डिटेल्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 15:39 IST

नवीन वर्ष सुरू झालंय. यासोबतच बचतीबाबतही नवीन प्लॅन तयार केला पाहिजे.

Post Office MIS 2024: नवीन वर्ष सुरू झालंय. यासोबतच बचतीबाबतही नवीन प्लॅन तयार केला पाहिजे. बचतीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणुकीची रक्कम सुरक्षित असावी आणि त्यावर खात्रीशीर परतावाही मिळावा. यासाठी सरकारची पोस्ट ऑफिस स्कीम ही पहिली पसंती आहे. कारण इथे तुम्हाला बचतीवर सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळतो. खात्रीशीर परताव्याचा आकडा बहुतेक बँकांच्या एफडीपेक्षा जास्त आहे. अशीच एक बचत योजना म्हणजे मासिक उत्पन्न योजना, ज्यामध्ये एकरकमी ठेवीवर दरमहा उत्पन्न मिळतं.

Post Office MIS 2024 Calculation

गुंतवणूक: 9 लाख रुपयेवार्षिक व्याज दर: 7.4%कालावधी: 5 वर्षेव्याजातून कमाई: 3,33,000 रुपयेमासिक उत्पन्न: 5,550 रुपये

महत्त्वाच्या बाबीपोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही सिंगल अकाऊंटध्ये ९ लाख रुपये आणि जॉईंट अकाऊंटमध्ये १५ लाख रुपये जमा करू शकता. तुमची इच्छा असल्यास, तुमची एकूण मूळ रक्कम ५ वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीनंतर परत केली जाईल. त्याच वेळी, ते आणखी ५-५ वर्षांसाठी वाढविले जाऊ शकते. दर ५ वर्षांनी, मूळ रक्कम काढण्याचा किंवा योजनेला मुदतवाढ देण्याचा पर्याय असेल. खात्यावर मिळणारे व्याज दर महिन्याला पोस्ट ऑफिस बचत खात्यात टाकलं जातं. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेतील गुंतवणुकीवर टीडीएस कापला जात नाही. मात्र, तुमच्या हातात येणारे व्याज करपात्र असते.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक