Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:52 IST

Pradhan Mantri MUDRA Yojana : केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री मुद्रा योजने' अंतर्गत, तुम्ही कोणत्याही तारणशिवाय २० लाखांपर्यंतचे कर्ज मिळवू शकता.

Pradhan Mantri MUDRA Yojana : देशातील छोटे व्यावसायिक, दुकानदार आणि नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारने २०१५ मध्ये सुरू केलेली 'प्रधानमंत्री मुद्रा योजना' आता अधिक सक्षम झाली आहे. 'स्वयंरोजगारातून राष्ट्रविकास' हे ध्येय समोर ठेवून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयामार्फत ही योजना राबवली जाते. विशेष म्हणजे, २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय घोषणेनंतर आता या योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा १० लाखांवरून थेट २० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मुद्रा योजनेच्या ४ प्रमुख श्रेणीउद्योजकांच्या गरजेनुसार या योजनेचे चार भागात वर्गीकरण करण्यात आले आहे.

  • शिशु कर्ज : नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज.
  • किशोर कर्ज : ५०,००० ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज.
  • तरुण कर्ज : ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज.
  • तरुण प्लस : १० लाख ते २० लाख रुपयांपर्यंत मोठे कर्ज.

कोणत्या व्यवसायांसाठी मिळते कर्ज?मुद्रा कर्ज केवळ उत्पादन क्षेत्रासाठीच नाही, तर विविध सेवांसाठीही उपलब्ध आहे.

  • उत्पादन घटक : छोटे कारखाने किंवा वर्कशॉप.
  • अन्न प्रक्रिया : लोणचे, पापड, मसाला उद्योग इ.
  • किरकोळ विक्री : छोटे दुकानदार, फळ-भाजी विक्रेते.
  • वाहतूक आणि लॉजिस्टिक : टेम्पो, रिक्षा किंवा मालवाहू वाहने.
  • सेवा क्षेत्र : सलून, टेलरिंग, रिपेअरिंग शॉप.

विनागॅरंटी आणि सुलभ प्रक्रियामुद्रा कर्जाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतीही मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नसते.

  1. कमी कागदपत्रे : इतर व्यावसायिक कर्जांच्या तुलनेत येथे कागदपत्रांची जत्रा कमी असते.
  2. झिरो प्रोसेसिंग फी : 'शिशु' कर्जासाठी बँका सहसा कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारत नाहीत.
  3. व्याजदर आणि कालावधी : व्याजदर साधारणपणे ९% ते १२% दरम्यान असतात आणि कर्ज परतफेडीसाठी ५ वर्षांपर्यंतचा सवलतीचा कालावधी मिळतो.

वाचा - गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'

अर्ज कसा करावा? (ऑनलाईन आणि ऑफलाईन)

  • आता 'ई-मुद्रा' सुविधेमुळे घरबसल्या कर्ज मिळवणे सोपे झाले आहे.
  • ऑनलाईन अर्ज : https://udyamimitra.in या पोर्टलवर जाऊन 'Apply for Mudra Loan' निवडा.
  • कागदपत्रे : आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक तपशील, पासपोर्ट फोटो आणि व्यवसाय आराखडा अपलोड करा.
  • ई-केवाईसी : आधार लिंक मोबाईल नंबरच्या मदतीने कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करा.
  • ऑफलाईन : तुम्ही जवळच्या कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेत जाऊनही अर्ज करू शकता. 
English
हिंदी सारांश
Web Title : Farmer to Entrepreneur: Start Your Business with Mudra Loan!

Web Summary : Mudra Yojana supports small businesses with loans up to ₹20 lakh, sans collateral. It covers manufacturing, food processing, retail, transport, and services. Apply online or offline with minimal paperwork and attractive interest rates.
टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकव्यवसायपैसा