Gold Investment: गुंतवणूकदारांसाठी सोनं हा सुरक्षित पर्याय मानला जातो. गेल्या दोन वर्षांत आणि गेल्या २५ वर्षांतही सोन्यानं शेअर बाजारालाही मागे टाकलंय. झिरोदाचे सीईओ नितीन कामथ यांनी सोनं आणि निफ्टी ५० च्या कामगिरीची तुलना केली. २००० पासून सोन्यानं २,०२७% परतावा दिलाय. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या बेंचमार्क इंडेक्सनं १,४७०% परतावा दिला. कठीण काळातही सोनं चांगली कामगिरी करतं, हे यातून दिसून येतं. २००८ ची आर्थिक मंदी आणि कोरोना महासाथीच्या काळातही सोन्यानं चांगली कामगिरी केली होती.
कामथ यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय गुंतवणूकदारांसाठी सोनं हा चांगला पर्याय आहे. हे त्यांना त्यांच्या गुंतवणुकीची वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विभागणी करण्यास मदत करते. सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) आता उपलब्ध नाहीत. त्यामुळे गोल्ड ईटीएफ हा सोन्यात गुंतवणुकीचा उत्तम मार्ग ठरू शकतो.
दुबईवरून सोनं खरेदी करुन आणणं स्वस्त आहे का, पाहा विना टॅक्स किती Gold भारतात आणता येतं?
कामथ यांनी गोल्ड आणि निफ्टीच्या कामगिरीची तुलना करणारा चार्टही शेअर केला आहे. आर्थिक मंदीच्या काळात निफ्टी घसरला होता, पण सोन्याचे दर स्थिर होते, असं चार्टवरून दिसून येतं. "सोन्याचे दर का वाढतात हे कोणीही सांगू शकत नाही, पण ते काम करतं," असं कामथ म्हणाले.
०२५ मध्ये सोन्याच्या दरात १८ टक्क्यांनी वाढ
सोन्यानंही अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. २०२५ मध्ये सोन्याच्या किंमतीत १८% वाढ झाली, तर निफ्टी लार्ज मिडकॅप २५० मध्ये ६% घसरण झाली. २०२४ मध्ये सोन्यानं २५ टक्के, तर निफ्टी लार्जकॅप २५० ने १९ टक्के परतावा दिला. यावरून बाजारातील अस्थिरतेच्या काळातही सोनं चांगली कामगिरी करतं, हे दिसून येतं.
२००५ पासून सोन्याने दरवर्षी सरासरी २० टक्के परतावा दिलाय. सोन्यानं केवळ ३ वेळा नकारात्मक परतावा दिला आहे. २०२३ मध्ये १८ टक्के, २०१५ मध्ये ८ टक्के आणि २०२१ मध्ये २ टक्क्यांनी यात घट झाली. "इक्विटीपेक्षा सोन्यानं चांगला परतावा दिला आहे. मी तारखा थोड्या बदलत आहे, पण हे खरे आहे की २००० पासून सोन्याने निफ्टीपेक्षा चांगला परतावा दिलाय," असं कामथ म्हणाले.