Join us

PF Money Withdrawal : इमर्जन्सीमध्ये PF चे पैसे कसे काढायचे? कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्याची करू शकता अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:21 IST

Provident Fund Withdrawal: वैद्यकीय आणीबाणी किंवा घर खरेदी करणे यासारख्या अनेक परिस्थितींमध्ये पीएफचे पैसे मुदतपूर्तीपूर्वी काढता येतात. यासाठी २ पर्याय आहेत.

PF amount withdrawal : प्रॉव्हिडेंट फंड (PF) किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) हा कोणत्याही संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बचत करण्याचा एक चांगला मार्ग आहे. या अंतर्गत, कर्मचाऱ्याला दरमहा त्याच्या मूळ वेतनाच्या १२ टक्के योगदान द्यावे लागते. त्याचवेळी नियोक्त्याचंही समान योगदान असते. यावर वार्षिक व्याज दिले जाते. निवृत्तीनंतर कर्मचारी एकरकमी पीएफ निधी काढू शकतात. पण, अनेकदा इमर्जन्सीमध्ये तत्काळ पैशाची निकड भासू शकते. अशा परिस्थितीत आपात्कालीन स्थितीत तुम्ही हे पैसे काढू शकता. यासाठी काय करावे लागते ते आपण पाहू.

अशा प्रकारे काढा पीएफचे पैसेवैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत, घरात कोणतेही लग्न, शिक्षण किंवा नवीन घर खरेदी करताना, तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पीएफचे पैसे काढू शकता. ईपीएफची रक्कम ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन प्रकारे काढता येते. ऑनलाइन पैसे काढण्यासाठी तुम्हाला ईपीएफच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यासाठी UAN नंबर आणि पासवर्ड आवश्यक असेल. यामध्ये तुम्ही पीएफ खात्यातून तुमच्या खात्यात सहज पैसे ट्रान्सफर करू शकता.

ऑफलाइन देखील करू शकता अर्ज जर तुम्हाला पीएफ रकमेसाठी ऑफलाइन अर्ज करायचा असेल, तर तुमचा आधार आणि बँक खाते तपशील UAN पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही थेट ईपीएफओ कार्यालयात जाऊन फॉर्म सबमिट करून पीएफचे पैसे काढू शकता. परंतु, जर आधार आणि बँक खात्याचा तपशील UAN पोर्टलवर अपडेट केलेला नसेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही ज्या संस्थेत किंवा कंपनीमध्ये काम करता, तिथून पडताळणी झाल्यानंतर तुम्ही EPFO ​​कार्यालयात फॉर्म सबमिट करुन पीएफचे पैसे काढू शकता.

दावा केलेल्या रकमेची स्थिती ऑनलाइन तपासून तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होतील, याची माहिती मिळवू शकता. यासाठी, UAN पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला ‘ऑनलाइन सेवा’ टॅबवर जावे लागेल आणि ‘ट्रॅक क्लेम स्टेटस’ वर क्लिक करावे लागेल. आता तुम्ही संदर्भ क्रमांक टाकून दावा केलेल्या रकमेची स्थिती तपासू शकता.

ग्राहक सेवा सुविधा उपलब्धयासंबंधित माहितीसाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 14470 वर कॉल करू शकता किंवा 9966044425 या मिस्ड कॉलद्वारे माहिती मिळवू शकता. याशिवाय, तुम्ही 'EPFOHO UAN' हा मेसेज 7738299899 वर पाठवून शिल्लक माहिती मिळवू शकता किंवा तुम्ही employeefeedback@epfindia.gov.in वर ईमेल देखील पाठवू शकता. 

टॅग्स :गुंतवणूकपैसाकेंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणकामगार