Join us

फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 14:49 IST

EPFO Balance : ईपीएफओ बॅलन्स तपासण्यासाठी कोणत्याही वेबसाइटवर लॉग इन करण्याची किंवा ईपीएफओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसून मिस्ड कॉल किंवा एसएमएसद्वारे संपूर्ण माहिती मिळवू शकता.

EPFO Balance : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) हा सर्वात सुरक्षित आणि विश्वासार्ह निवृत्ती बचत पर्यायांपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत, कर्मचारी त्याच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या १२ टक्के योगदान देतो. तर तेवढीच रक्कम मालकाकडून देखील दिली जाते. या रकमेवर ईपीएफओ दरवर्षी निश्चित व्याज देते. यामध्ये निवृत्तीपर्यंत मोठी रक्कम जमा होते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या खात्यात वेळेवर पैसे जमा होतात का? हे पाहणे आवश्यक आहे. तुम्ही घरबसल्या मोबाईलवरुनही पीएफ खात्यातील शिल्लक तपासू शकता.

ईपीएफओ शिल्लक कशी तपासायची?आपत्कालीन परिस्थितीत, कर्मचारी शिल्लक रकमेचा काही भाग काढू शकतात. पण, त्यासाठी खात्यात किती पैसे आहेत हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही वेबसाइटवर लॉग इन करण्याची किंवा ईपीएफओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही मिस्ड कॉल देऊन किंवा एसएमएस पाठवून तुमचा ईपीएफ बॅलन्स तपासू शकता, तेही अगदी मोफत.

ही सुविधा मिळविण्यासाठी तुमचा UAN क्रमांक सक्रिय असणे आवश्यक आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही https://unifiedportal-mem.epfindia.gov.in वर जाऊन तुमचा UAN नंबर सक्रिय करू शकता. यासोबतच, तुमचा मोबाईल नंबर आणि किमान एक केवायसी कागदपत्र (बँक खाते क्रमांक, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड) नोंदणीकृत असणे आणि तुमच्या UAN शी लिंक करणे देखील महत्त्वाचे आहे.

या नंबरवर मिस्ड कॉल द्यामिस्ड कॉलद्वारे ईपीएफ बॅलन्स तपासण्यासाठी, तुमच्या यूएएन-लिंक्ड मोबाइल नंबरवरून ९९६६०४४४२५ वर मिस्ड कॉल द्या. दोन रिंग वाजल्यानंतर, तुमचा कॉल आपोआप डिस्कनेक्ट होईल आणि तुम्हाला त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. काही सेकंदात तुम्हाला एसएमएसद्वारे, खात्यातील शिल्लक रक्कम आणि तुमच्या मागील ईपीएफ योगदानाची संपूर्ण माहिती एसएमएसद्वारे पाठवली जाईल. ही सेवा पूर्णपणे मोफत असून २४×७ उपलब्ध आहे.

वाचा - पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा

एसएमएसद्वारे पीएफ बॅलन्स समजतोतुम्ही काही सेकंदात एसएमएसद्वारे तुमच्या खात्याची माहिती तपासू शकता. यासाठी, 'EPFOHO UAN' टाइप करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून ७७३८२९९८९९ वर पाठवा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही इंग्रजीऐवजी तुमच्या पसंतीच्या भाषेतही संदेश प्राप्त करू शकता. यासाठी, त्या भाषेच्या नावाची पहिली तीन अक्षरे संदेशाच्या शेवटी जोडावी लागतील, जसे की मराठीसाठी 'EPFOHO UAN MAR'. त्याचप्रमाणे, तुम्हाला पीएफशी संबंधित माहिती हिंदी, पंजाबी, गुजराती, कन्नड, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि बंगाली अशा कोणत्याही भाषेत मिळू शकते.

टॅग्स :ईपीएफओगुंतवणूककर्मचारी