Join us  

आता UPI द्वारेही शेअर्स विकत घेता येणार, 'या' तारखेपासून सुरू होणार नवी सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 2:49 PM

लवकरच तुम्ही UPI च्या मदतीने शेअर्सची खरेदी आणि विक्री करू शकाल.

लवकरच तुम्ही UPI (Unified Payments Interface) च्या मदतीने शेअर्सची खरेदी आणि विक्री करू शकाल. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) 'UPI फॉर सेकंडरी मार्केट' पुढील आठवड्यात म्हणजेच १ जानेवारी रोजी लॉन्च केलं जाणार असल्याची माहिती दिली. हे लॉन्च सध्या इक्विटी कॅश सेगमेंटसाठी बीटा व्हर्जनमध्ये केलं जाणार आहे. क्लिअरिंग कॉर्पोरेशन, स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज, स्टॉक ब्रोकर्स, बँका आणि युपीआय अॅप प्रोव्हायडर्ससह प्रमुख भागधारकांचा याला सपोर्ट मिळणार आहे.

NPCI च्या म्हणण्यानुसार ब्लॉक मेकॅनिझमद्वारे सेकंडरी मार्केटमध्ये ब्लॉक करण्यात आलेली रक्कम सपोर्टेड ट्रेडिंगचं अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंटसारख्या सुविधेला सेबीनं मंजुरी दिली. हे युपीआयमधील सिंगल-ब्लॉक-आणि-मल्टिपल-डेबिटच्या RBI-मंजूर सुविधेवर आधारित आहे आणि त्याच्या अंमलबजावणीची तारीख १ जानेवारी निश्चित करण्यात आली आहे.सुरुवातीला ठराविक ग्राहकांना लाभ मिळणारएनपीसीआयनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की सुरुवातीला ही फंक्शनॅलिची मर्यादित पायलट कस्टमर्ससाठी उपलब्ध असेल. या प्रकल्पादरम्यान, गुंतवणूकदार त्यांच्या बँक खात्यांमधील रक्कम ब्लॉक करू शकतात, जे सेटलमेंट दरम्यान व्यापाराची पुष्टी झाल्यानंतरच क्लिअरिंग कॉर्पोरेशनद्वारे डेबिट केलं जाईल. क्लिअरिंग कॉर्पोरेशन या ग्राहकांना थेट T+1 आधारावर पेआउटची प्रक्रिया करतील. सुरुवातीला एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.कोणती असतील ब्रोकरेज अॅपGroww 'यूपीआय फॉर सेकंडरी मार्केट' बीटा लॉन्चसाठी ब्रोकरेज अॅप म्हणून काम करत आहे. तर BHIM, Groww आणि YES PAY NEXT हे युपीआय अॅप्स म्हणून कार्यरत असतील. एचडीएफसी बँक, एचएसबीसी, आयसीआयसीआय बँक आणि येस बँक या एक्सचेंजेससाठी क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि स्पॉन्सर बँका म्हणून काम करत आहेत. झिरोधा सारखा स्टॉक ब्रोकर, अॅक्सिस बँक आणि येस बँक सारख्या बँका आणि पेटीएम, फोनपे सारख्या युपीआय अनेबल्ड अॅप्ससह इतर स्टेकहोल्डर्स सर्टिफिकेशनच्या स्टेजमध्ये आहेत, असं निवेदनात म्हटलं आहे. 

टॅग्स :शेअर बाजारएचडीएफसीआयसीआयसीआय बँक