UPI Rules Change 1 January : १ जानेवारीपासून नियमांमध्ये काही बदल होणार आहेत. पण सर्वात मोठा बदल यूपीआयच्या नियमांमध्ये होणार आहे. आज आम्ही तुम्हाला यूपीआयच्या नियमांची माहिती देणार आहोत. तसंच यात नवीन बदल होणार आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आरबीआयनं यूपीआय १२३ पेच्या ट्रान्झॅक्शन लिमिटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेनं ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. यूपीआय १२३ पेचा वापर करून युजर्स ५,००० रुपयांऐवजी १०,००० रुपयांचे व्यवहार करू शकतील.
काय आहे UPI 123Pay?
UPI 123Pay सर्व्हिस युझर्सना दिली जाते. ही एक अशी सेवा आहे ज्यामध्ये युजर्सना इंटरनेट कनेक्शनशिवाय पैसे भरण्याचा पर्याय दिला जातो. त्यामुळेच अशा व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआयकडून अनेक प्रयत्न केले जातात. पण आता त्यातही बदल करण्यात आला आहे. यूपीआय १२३ पे मध्ये युजर्सना पेमेंट करण्यासाठी जास्तीत जास्त ४ पर्याय दिले जातात. यामध्ये आयव्हीआर नंबर, मिस्ड कॉल, ओईएम-एम्बेडेड अॅप्स आणि साउंड बेस्ड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.
काय आहे डेडलाइन?
यूपीआयच्या नव्या नियमांसाठी डेडलाइन जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये युजर्संना १ जानेवारी २०२५ पर्यंतची मुदत देण्यात येणार आहे. म्हणजेच यानंतर युजर्स १०,००० रुपयांपर्यंतचे व्यवहार सहज करू शकतील. मात्र, यासोबत ओटीपी बेस्ड सेवेची भर पडली आहे. म्हणजेच पेमेंट करण्यासाठी तुम्हाला ओटीपीची गरज भासणार आहे. पेमेंट करायचं असेल तर ओटीपीचा वापर करावा लागेल. कारण सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.