Investment Tips: प्रत्येक व्यक्तीनं निश्चितच गुंतवणूक केली पाहिजे. गुंतवणूक करून तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित करताच, शिवाय एक चांगला निधी देखील जमा करता, जो कठीण काळात आणि निवृत्तीनंतर कामी येतो. प्रत्येक व्यक्तीनं तरुणपणापासून गुंतवणूक सुरू करावी आणि निवृत्तीचं नियोजन देखील केलं पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशा गुंतवणुकीच्या सूत्राबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही निवृत्तीपर्यंत ३ कोटी रुपयांचा निधी गोळा करू शकता. आम्ही म्युच्युअल फंड एसआयपीबद्दल बोलत आहोत. जाणून घेऊया अधिक माहिती.
एसआयपी द्वारे निवृत्ती निधी तयार करा
एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं हळूहळू लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. म्युच्युअल फंड एसआयपीची खास गोष्ट म्हणजे येथे तुम्ही दरमहा थोडी गुंतवणूक करून कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा करू शकता. तथापि, यासाठी तुम्हाला तुमची गुंतवणूक दीर्घकाळ चालू ठेवावी लागेल.
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
३ कोटी रुपयांचा निधी उभारता येऊ शकेल
जर तुम्ही आता २५ वर्षांचे असाल तर तुम्ही तुमचे निवृत्ती नियोजन आत्ताच सुरू करावं. म्युच्युअल फंड एसआयपी बद्दल खास गोष्ट म्हणजे तुम्हाला त्यात थोडीच गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही दररोज १०० रुपये वाचवले आणि ३५ वर्षांसाठी म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक केली तर तुम्ही ३ कोटी रुपयांपर्यंतचा निधी जमा करू शकता.
समजा दररोज १०० रुपये वाचवून, तुम्ही दरमहा एकूण ३००० रुपये वाचवू शकता. तुम्हाला हे ३००० रुपये म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवावे लागतील. तुम्हाला हे ३५ वर्षे म्हणजेच तुमचे वय ६० वर्षे होईपर्यंत चालू ठेवावं लागेल. अशा प्रकारे, तुम्ही ३५ वर्षांत एकूण १२.६० लाख रुपये गुंतवाल. जर तुम्हाला १५ टक्के परतावा मिळाला तर तुमचा एकूण निधी ३.४२ कोटी रुपये असेल. यामध्ये फक्त ३.२९ कोटी रुपये तुमचा नफा असेल.
(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)