Join us

मुकेश अंबानींचे विश्वासू; ₹७५ कोटींची नोकरी सोडून बनले संन्यासी, कोण आहेत प्रकाश शाह..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:50 IST

Mukesh Ambani Close Aide Becomes Monk: रिलायन्स समूहात उच्च पदावर नोकरी केली. मुकेश अंबानींच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात महत्वाची भूमिका बजावली.

Who is Prakash Shah: उद्योगपती मुकेश अंबानी यांचे काही खास मित्र, सहकारी आणि कर्मचारी आहेत, अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत आहेत. चांगल्या-वाईट काळात आणि प्रत्येक लहान-मोठ्या निर्णयांमध्ये मुकेश यांना त्यांची साथ लाभली आहे. खासगी असो किंवा वैयक्तिक असो, अंबानींनी आपल्या विश्वासू माणसांशी सल्लामसलत केल्याशिवाय निर्णय घेतलेले नाही. दरम्यान, आता मुकेश यांच्या एका विश्वासू कर्मचाऱ्याने त्यांची साथ सोडून आधात्म्याचा मार्ग निवडला आहे. 

कोण आहेत प्रकाश शाह ?मुकेश अंबानी यांचे जवळचे सहकारी प्रकाश शाह यांनी दीक्षा घेतली आहे. कॉर्पोरेट आयुष्य, पैसा-अडका...सर्व काही सोडून ते आता संन्यासी बनले आहेत. विशेष म्हणजे, फक्त प्रकाश शाहाच नाही, तर त्यांची पत्नी नैना शाह आणि त्यांच्या मुलानेही दीक्षा घेतली आहे. प्रकाश शाह हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष होते. ते अनेक वर्षांपासून रिलायन्सशी जोडलेले होते. त्यांनी कंपनीला आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे दिली, परंतु वयाच्या ६३ व्या वर्षी निवृत्त झाले आणि आता सर्वकाही सोडून आधात्म्याचा मार्ग निवडला आहे.

७५ कोटी रुपयांवर सोडले पाणी

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करताना प्रकाश यांचा पगार ७५ कोटी रुपये होता. प्रकाश शाह हे मुकेश अंबानी यांचे उजवे हात मानले जात होते. रिलायन्सच्या प्रमुख निर्णयांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी रिलायन्समध्ये काम सुरू केले. त्यांच्या कामामुळे आणि क्षमतेमुळे ते मुकेश अंबानींच्या खूप जवळचे झाले. 

मुकेश अंबानी यांचे उजवे हातरिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये काम करताना त्यांनी अनेक मोठे प्रकल्प हाताळले. जामनगर पेटकोक गॅसिफिकेशन प्रोजेक्ट आणि पेटकोक मार्केटिंग सारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी या प्रकल्पांची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि ते यशस्वीरित्या पूर्ण केले. मुकेश अंबानी जेव्हा जेव्हा कंपनीशी संबंधित मोठे काम करायचे किंवा मोठा निर्णय घ्यायचे, तेव्हा ते प्रकाश शाह यांचा सल्ला नक्कीच घ्यायचे. त्यांच्या अनुभवामुळे त्यांनी रिलायन्सला नवीन उंचीवर नेले. मात्र आता त्यांनी सर्वकाही सोडून संन्यासी आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सअध्यात्मिकव्यवसायगुंतवणूकसोशल व्हायरल