Max Life Pension Fund Licence Cancel: पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (PFRDA) मॅक्स लाईफ पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेडचं (Max Life PFM) रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (Registration Certificate) रद्द केलं आहे. हे २ जून २०२५ पासून प्रभावी झालं आहे. कंपनीनं ३१ डिसेंबर २०२४ रोजी एका पत्राद्वारे केलेल्या विनंतीला प्रतिसाद म्हणून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. कंपनीनं ३१ डिसेंबर २०२४ च्या आपल्या पत्रात पेन्शन फंड म्हणून कामकाज बंद करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता PFRDA ने ही विनंती स्वीकारली आहे.
कंपनीनं वेबसाइटवर दिली माहिती
मॅक्स लाईफनं आपल्या वेबसाइटवर ही घोषणा केली आहे की, त्यांनी राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत पेन्शन फंड मॅनेजर आणि पॉईंट ऑफ प्रेझेन्स म्हणून आपलं कामकाज थांबवलं आहे. PFRDA नं निवेदनात म्हटलंय की, मॅक्स लाईफ पेन्शन फंडशी संबंधित सर्व ग्राहक दुसऱ्या पेन्शन फंडात हस्तांतरित करण्यात आले आहेत. यावेळी सर्व खातेधारकांना त्यांच्या आवडीनुसार नवीन पेन्शन फंड निवडण्याचा पर्याय देखील देण्यात आलाय.
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
कंपनीच्या वेबसाइटनुसार, १९ एप्रिल २०२५ पासून मॅक्स लाईफद्वारे व्यवस्थापित केलेले सर्व NPS फंड UTI पेन्शन फंडकडे हस्तांतरित करण्यात आले, तर २१ जून २०२५ पासून POP शी संबंधित सर्व ग्राहक अॅक्सिस बँकेत (Axis Bank) ट्रान्सफर करण्यात आले आहेत. हे पाऊल कंपनीच्या रिब्रँडिंग आणि पुनर्रचनेमुळे उचलण्यात आलं आहे. कंपनी आता वॉलंटरी लिक्विडेश प्रक्रियेत असल्याचंही कंपनीनं म्हटलंय.
NPS सदस्यांवर परिणाम होईल का?
जे ग्राहक नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) अंतर्गत मॅक्स लाईफशी जोडलेले होते, त्यांची गुंतवणूक सुरक्षित आहे. केवळ व्यवस्थापनाची जबाबदारी बदलली आहे. आता या ग्राहकांच्या गुंतवणुकीची देखरेख UTI पेन्शन फंड करेल. NPS ची संपूर्ण व्यवस्था PFRDA च्या नियमांनी नियंत्रित होते, त्यामुळे कोणत्याही ग्राहकाला फंडाच्या सुरक्षेबद्दल किंवा गुंतवणुकीच्या स्थितीबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही.
काय आहे NPS?
NPS म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम, भारत सरकारची एक दीर्घकालीन बचत योजना आहे, जी निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न सुनिश्चित करण्यासाठी तयार केली गेली आहे. यामध्ये गुंतवणूकदार त्यांच्या योगदानातून एक रिटायरमेंट फंड तयार करतात, ज्याचा उपयोग भविष्यात पेन्शन देण्यासाठी केला जातो.
Web Summary : Max Life Pension Fund's license is cancelled by PFRDA. NPS members' investments are safe, managed by UTI Pension Fund now. All customers transferred; option to choose new fund. Company undergoing voluntary liquidation.
Web Summary : पीएफआरडीए द्वारा मैक्स लाइफ पेंशन फंड का लाइसेंस रद्द कर दिया गया है। एनपीएस सदस्यों का निवेश सुरक्षित है, अब यूटीआई पेंशन फंड द्वारा प्रबंधित किया जाएगा। सभी ग्राहकों को स्थानांतरित किया गया; नया फंड चुनने का विकल्प। कंपनी स्वैच्छिक परिसमापन से गुजर रही है।