Join us

महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 10:13 IST

LIC Bima Sakhi Yojana : एलआयसी विमा सखी योजनेअंतर्गत, महिला एजंटला पहिल्या ३ वर्षांच्या कामगिरीवर आधारित मासिक रक्कम दिली जाते. पहिल्या वर्षी दरमहा ७००० रुपये निश्चित रक्कम दिली जाते.

LIC Bima Sakhi Yojana : तुम्हाला जर घरातून काम करुन पैसे कमवायचे असेल तर एक संधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय जीवन विमा महामंडळाने महिलांसाठी एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव 'एलआयसी विमा सखी योजना' आहे. या योजनेअंतर्गत, महिलांना कोणताही पैसा गुंतवण्याची गरज नाही. त्यांना दरमहा एक निश्चित रक्कम कमवण्याची संधी मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि दुर्गम भागांमध्ये विम्याबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे.

एलआयसी विमा सखी योजना म्हणजे काय?ही योजना महिलांना एलआयसी एजंट बनण्याची संधी देते. या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना खास प्रशिक्षण दिले जाईल. एजंट म्हणून काम करताना, त्यांना दरमहा ठराविक पगार दिला जाईल. याचा उद्देश महिलांना विम्याबद्दल माहिती देऊन, त्याबद्दल जागरूकता पसरवण्यास प्रोत्साहित करणे आहे.

या योजनेत तुम्ही किती कमवू शकता?

  • एलआयसी विमा सखी योजनेत महिला एजंटना त्यांच्या कामाच्या आधारावर पहिल्या तीन वर्षांसाठी मासिक रक्कम दिली जाते.
  • पहिल्या वर्षी: दरमहा ७,००० रुपयांची निश्चित रक्कम मिळेल.
  • दुसऱ्या वर्षी: जर पहिल्या वर्षी उघडलेल्या किमान ६५% पॉलिसी सुरू राहिल्या, तर दरमहा ६,००० रुपये मिळतील.
  • म्हणजे प्रत्येक वर्षी ८४ हजार आणि पुढचे ३६ महिन्यात तुम्ही २.५ लाख रुपये कमावू शकता. या व्यतिरिक्त प्रत्येक पॉलिमध्ये मिळणारे कमिशन वेगळी कमाई आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • या योजनेत अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे लागतील.
  • वयाचा पुरावा (वय १८ ते ७० वर्षे असावे)
  • पत्त्याचा पुरावा
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (किमान १०वी पास)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

ही सर्व कागदपत्रे स्वतः प्रमाणित केलेली (self-attested) असावीत.

कोण अर्ज करू शकतो?

  • कोणतीही भारतीय महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते.
  • अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ७० वर्षे असावे.
  • किमान १०वी पास असणे आवश्यक आहे.
  • कोणाला लाभ मिळणार नाही?

जर तुम्ही आधीच एलआयसीचे एजंट किंवा कर्मचारी असाल, तर तुम्ही या योजनेत अर्ज करू शकत नाही. तसेच, एलआयसीचे निवृत्त कर्मचारी आणि त्यांचे जवळचे नातेवाईक (पती, पत्नी, मुले, पालक, भावंडे) यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

वाचा - आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या एलआयसी कार्यालयात किंवा त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकता. ही योजना महिलांसाठी एक मोठी आर्थिक संधी निर्माण करू शकते.

टॅग्स :एलआयसीगुंतवणूकपैसानोकरी