Join us

Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:57 IST

Jio Blackrock: पाहा काय म्हटलंय कंपनीनं आणि काय आहे कंपनीचा पुढचा प्लान.

Jio Blackrock: अंबानी यांची कंपनी जिओ फायनान्शियलच्या शेअरमध्ये आज सकाळी बीएसईवर जवळपास ५ टक्क्यांनी वाढ झाली. बाजार नियामक सेबीनंजिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंगला स्टॉक ब्रोकर आणि शेअर बाजाराचे क्लिअरिंग सदस्य म्हणून काम करण्यास मान्यता दिल्यानं शेअरमध्ये ही तेजी दिसून आली.

आज, शुक्रवारी, २७ जून रोजी जिओ फायनान्शियलच्या शेअरचा भाव ३१३.८५ रुपयांवर उघडला, याची मागील बंद किंमत ३१२.४० रुपये होती. त्यानंतर तो ४.५ टक्क्यांनी वधारून ३२६.५५ रुपयांच्या दिवसातील उच्चांकी पातळीवर पोहोचला. सकाळच्या सुमारास हा शेअर ४.३५ टक्क्यांनी वधारून ३२६ रुपयांवर व्यवहार करत होता. शेअरच्या वाढीचा हा सलग चौथा दिवस आहे. दुपारच्या सत्रात मात्र यात किंचित घसरण झाली आणि शेअर ३.८४ टक्क्यांच्या वाढीसह ३२४ रुपयांवर व्यवहार करत होता.

अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...

सेबीने दिली मंजुरी

जिओ फायनान्शिअलने २७ जून रोजी शेअर बाजाराला यासंदर्भातील माहिती दिली. सेबीनं जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडला २५ जून २०२५ रोजी स्टॉकब्रोकर/क्लिअरिंग मेंबर म्हणून काम करण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र दिलं आहे. जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंग ही जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.

काय म्हणाली कंपनी?जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क पिलग्राम यांनी यावर प्रतिक्रिया दिली. 'जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सच्या माध्यमातून आम्ही छोट्या गुंतवणूकदारांना वैयक्तिक सल्ला देऊ शकू. आता ब्रोकरेजसोबत आम्ही सेल्फ डायरेक्टेड गुंतवणूकदारांसाठी एक्झिक्युशन प्लॅटफॉर्मही आणणार आहोत." असं ते म्हणाले.

पेमेंट्स बँकेत गुंतवणूक

दरम्यान, कंपनीनं आपल्या पेमेंट बँक भाग जिओ पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये १९० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसनं (जेएफएसएल) या पूर्ण मालकीच्या उपकंपनीतील प्रत्येकी १० रुपयांचे १९ कोटी इक्विटी शेअर्स रोखीने खरेदी केलेत.

टॅग्स :मुकेश अंबानीजिओसेबी