Gold Jewellery Insurance: भारतात सोनं खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच, हा एक महत्त्वाचा गुंतवणुकीचा पर्यायही आहे. सणासुदीच्या काळात तर सोन्याची प्रचंड खरेदी होते. अनेकजण सोनं खरेदी करून ते घरात साठवून ठेवतात. मात्र वाढत्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याचा विमा फायदेशी ठरतो.
घरात सोनं ठेवणे किती सुरक्षित?
आजकाल चोरी, दरोडे आणि घरफोडीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणातच नव्हे, तर कमी प्रमाणात सोनं घरात ठेवणेही धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत पर्याय म्हणून सोन्याचा विमा (गोल्ड इन्शुरन्स) हा सुरक्षित उपाय मानला जातो.
गोल्ड इन्शुरन्स म्हणजे काय?
गोल्ड इन्शुरन्सद्वारे तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करू शकता. यामध्ये सोन्याचे दागिने, सोन्याची नाणी आणि सोन्याचे बिस्किट (बार) सामील आहेत. या विम्यात चोरी किंवा दरोडा, बँक लॉकरमधील चोरी आणि प्रवासादरम्यान हरवलेलं सोनं कव्हर केले जाते. या विम्यासाठी दरवर्षी सोन्याच्या किंमतीच्या सुमारे १% ते २% इतका प्रीमियम भरावा लागतो.
गोल्ड इन्शुरन्स का आवश्यक?
अनेकांना वाटते की, घरातील सोनं सुरक्षित आहे, पण प्रत्यक्षात कोणतीही दुर्घटना कधीही घडू शकते. अलीकडच्या काळात सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे ते अधिक मौल्यवान होत चालले असून त्यावर चोरीचा धोका देखील वाढत आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी सोन्याचा विमा काढणे हा योग्य निर्णय ठरू शकतो.
Web Summary : Gold insurance protects against theft, covering jewelry, coins, and bars, even from bank lockers. With rising gold prices and increasing theft risks, insuring gold offers financial security and peace of mind despite a small premium cost.
Web Summary : सोने का बीमा चोरी से सुरक्षा करता है, जिसमें आभूषण, सिक्के और बार शामिल हैं, यहां तक कि बैंक लॉकर से भी। सोने की बढ़ती कीमतों और चोरी के बढ़ते जोखिमों के साथ, सोने का बीमा वित्तीय सुरक्षा प्रदान करता है और थोड़ा प्रीमियम लागत के बावजूद मन की शांति मिलती है।