Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' सरकारी योजनेत फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करा; 40 लाखांपर्यंत मिळेल रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 11:27 IST

PPF Account Details : येथे गुंतवणूक केल्याने तुम्हाला चांगले व्याज तर मिळतेच, याशिवाय कर सूट मिळण्यासही मदत होते. 

तुम्ही पैशांची गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला पीपीएफ खात्याबद्दल (PPF Account) सांगणार आहोत. येथे गुंतवणूक केल्याने तुम्हाला चांगले व्याज तर मिळतेच, याशिवाय कर सूट मिळण्यासही मदत होते. 

यामध्ये जोखमीचे टेन्शन नाही. ही एक सरकारी योजना आहे. गरज पडल्यास त्यातून पैसेही काढता येतात.जर तुम्हाला पीपीएफ खाते उघडायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. ही सरकारी बचत योजना आहे, त्यामुळे व्याजदर सरकार ठरवते. 

पीपीएफ खाते फक्त 500 रुपयांनी सुरू करता येते. पीपीएफ खात्यात तुम्हाला दरवर्षी किमान 500 रुपये जमा करावे लागतील. तुम्ही ते एकाच वेळी सबमिट केले पाहिजे असे नाही. तुमच्या सोयीनुसार तुम्ही ते थोडे-थोडे जमा करू शकता.

पीपीएफ खात्यात गुंतवणूक केल्यास वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळते. याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे आहे. जर तुम्ही एका वर्षात 500 रुपये जमा केले नाहीत तर तुमचे खाते डिफॉल्ट खात्याच्या कॅटगरीत टाकले जाते. ते पुन्हा चालू करण्यासाठी उर्वरित रक्कम 50 रुपयांच्या दंडासह जमा करावी लागेल.

पीपीएफ खात्याची 15 वर्षे पूर्ण झाल्यावर, तुम्हाला ठेवी आणि व्याजासह संपूर्ण पैसे परत मिळतात. परंतु, जर तुम्हाला त्या वेळी पैशांची गरज नसेल तर तुम्ही ते पुढील 5 वर्षांसाठीही गुंतवू शकता. पीपीएफ खाते 15 वर्षे पूर्ण झाल्यावर मॅच्युरिटी मिळते. यावेळी तुम्हाला 40 लाख रुपये मिळतील.

किती रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला किती परतावा मिळेल?1000 रुपये महिन्याला जमा केल्यावर 3 लाख 15 हजार 572 रुपये मिळतील.2000 रुपये महिन्याला जमा केल्यावर 6 लाख 31 हजार 135 रुपये मिळतील.3000 रुपये महिन्याला जमा केल्यावर 9 लाख 46 हजार 704 रुपये मिळतील.4000 रुपये महिन्याला जमा केल्यावर 12 लाख 72 हजार 273 रुपये मिळतील.5000 रुपये महिन्याला जमा केल्यावर 15 लाख 77 हजार 841 रुपये मिळतील.10000 रुपये महिन्याला जमा केल्यावर 31 लाख 55 हजार 680 रुपये मिळतील.12000 रुपये महिन्याला जमा केल्यावर 37 लाख 86 हजार 820 रुपये मिळतील.12250 रुपये महिन्याला जमा केल्यावर 39 लाख 44 हजार 699 रुपये मिळतील.

टॅग्स :पीपीएफगुंतवणूकपैसा