invest in fd : शेअर बाजारातील घसरण थांबायचं नाव घेताना दिसत नाही. बहुतांश गुंतवणूकदारांचे पोर्टफॉलीओ सध्या तोट्यात गेले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार पुन्हा एकदा पारंपरीक गुंतवणूक पर्यायांकडे वळत आहे. मुदत ठेव योजना ही सर्वात सुरक्षित आणि निश्चित परतावा देणारी लोकप्रिय योजना आहे. बहुतेक लोक पैसे गुंतवण्यासाठी बँक एफडीचा अवलंब करतात. तुम्हीही जास्त व्याजदर देणारी बँक शोधत असाल तर इथे आम्ही ५ बँकांची माहिती देत आहोत, जे ७.८५ टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत.
या बँकांच्या एफडीमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळेल
- देशातील आघाडीची खासगी बँक एचडीएफसी आपल्या ग्राहकांना १८ ते २१ महिन्यांच्या कालावधीसह मुदत ठेव योजनेवर ७.२५ टक्के व्याजदर देत आहे. हे व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.७७ टक्के आहेत. भांडवलाच्या बाबतीत एचडीएफसी बँक देशातील सर्वात मोठी दुसरी संस्था आहे. शेअर बाजारात दिग्गज कंपन्या कोसळत असताना एचडीएफसी मात्र नफ्यात आहे.
- ICICI बँक आपल्या ग्राहकांना १५ ते १८ महिन्यांच्या मुदती ठेव योजना ऑफर करत आहे. बँक सध्या FD वर ७.२५ टक्के व्याजदरल देत आहे. हे व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.८५ टक्क्यांपर्यंत आहेत.
- कोटक महिंद्रा बँक आपल्या ग्राहकांना ३९० दिवस ते ३९१ दिवसांच्या मुदतीसह FD वर ७.४ टक्के व्याजदर देते. हे व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.९ टक्क्यांपर्यंत आहेत.
- बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना 2 ते 3 वर्षांच्या कालावधीसह FD वर 7.15 टक्के व्याजदर ऑफर करते. हे व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६५ टक्क्यांपर्यंत आहेत.
- युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ४५६ दिवसांच्या मुदतीसह FD वर ७.३ टक्के व्याजदर देते. हे व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.८ टक्क्यांपर्यंत आहेत.