Gold Price Impacts on buying: जेव्हा जेव्हा सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत, तेव्हाही भारतीयांनी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केलं आहे. म्हणजेच, किंमती वाढल्या तरीही भारतीय सोनं खरेदी करणं थांबवत नाहीत, उलट त्याला गुंतवणुकीचं सर्वोत्तम साधन मानू लागतात. आणखी एक सर्वात मनोरंजक गोष्ट ही समोर आली आहे की, सोन्याच्या वाढत्या किंमती असूनही भारतीयांचं सोन्यावरील प्रेम कमी झालेले नाही.
साधारणपणे, जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत वाढते, तेव्हा तिची मागणी कमी होते, पण सोन्याच्या बाबतीत हा नियम भारतात कमी काम करतो. भारतीय कुटुंबे सोनं खरेदीच्या आपल्या निर्णयात किंमत वाढल्यावरही फारसा बदल करत नाहीत, असंच दिसून आलं आहे. ही सवय सांस्कृतिक महत्त्व, विवाहसोहळे, सण आणि बचतीच्या परंपरेशी जोडलेली आहे. सोन्याच्या किंमतीत जेव्हा वाढ होते, तेव्हा लोक हे मानून चालतात की सोन्याचा भाव आता खाली येणार नाही. साधारणपणे सोन्याच्या खरेदीबाबत भारतीयांचा हा विचार चुकीचाही नाही. आपल्या देशात गुंतवणुकीची पद्धत हळूहळू बदलत आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे.
२०२३ मध्ये सोन्याची आयात वाढली
उदाहरणार्थ, वर्ष २०२३ आणि २०२४ मध्ये सोन्याच्या किंमती १६ टक्के ते २० टक्क्यांपर्यंत वाढल्या, तरीही भारताची सोन्याची आयात कमी होण्याऐवजी थोडी वाढली. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ग्राहक खरेदीच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये भारतात ५७५.८ टन सोन्याच्या दागिन्यांची मागणी होती, तर बार्स आणि नाण्यांची मागणी १८५.२ टन होती.
२०२४ मध्ये दागिन्यांची मागणी घटली, पण...
तर, २०२४ मध्ये, दागिन्यांची मागणी थोडी कमी होऊन ५६३.४ टन राहिली, पण बार्स आणि नाण्यांची मागणी २३९.४ टनपर्यंत वाढली. यावरून हे देखील सिद्ध होते की जेव्हा उच्च किंमतींमुळे दागिन्यांची खरेदी मंदावली, तेव्हा लोकांनी सोन्याच्या बार्स आणि नाण्यांमध्ये गुंतवणूक वाढवली.
परंतु, आता एक बदल दिसत आहे. २०२५ च्या पहिल्या सहामाहीत, जेव्हा सोन्याच्या किंमती अचानक खूप वेगाने वाढल्या, तेव्हा भारतात मागणीत थोडी घट झाली. हे संकेत आहे की भारतीय सोन्यावर कितीही प्रेम करत असले तरी, एका मर्यादेनंतर वाढलेल्या किंमती मागणीवर परिणाम करू लागतात.
सोन्या-चांदीने नफ्याचे सर्व रेकॉर्ड तोडले
'धनत्रयोदशी' पूर्वी सोन्या आणि चांदीने नफ्याचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत। चांदीने १० महिन्यांपेक्षा कमी वेळेत दुपटीपेक्षा अधिक म्हणजे १०६.२४ टक्के नफा दिला आहे. चांदीचा हा आतापर्यंतचा सर्वात जलद परतावा आहे. तसंच, सोन्यानंही गुंतवणूकदारांना ६८.५५ टक्के लाभ मिळवून दिलाय.
३१ डिसेंबर २०२४ रोजी चांदीचा भाव ८९,७०० रुपये प्रति किलो होता. यात केवळ २८७ दिवसांत ९५,३०० रुपयांची जोरदार वाढ झाली आणि ती सर्वकालिक उच्चांकी पातळी १,८५,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली. इतकंच नव्हे, तर गेल्या दीड महिन्यात चांदीच्या किंमती सर्वात वेगाने वाढल्यात आणि यात ५९,००० रुपयांची वाढ झाली आहे. यात सप्टेंबरमध्ये २४,५०० आणि ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत ३४,५०० रुपयांपर्यंत भाव वधारलेत. ही देखील गेल्या अनेक दशकांतील आतापर्यंतची सर्वात जलद मासिक वाढ आहे.
Web Summary : Despite rising gold prices, Indian demand remained strong until recently. 2023 saw increased gold imports. 2024 showed a shift from jewelry to bars/coins. Recent price surges are now slightly impacting demand.
Web Summary : सोने की कीमतें बढ़ने के बावजूद, भारतीयों की मांग मजबूत बनी रही। 2023 में सोने का आयात बढ़ा। 2024 में गहनों से बार/सिक्कों की ओर बदलाव दिखा। हालिया मूल्य वृद्धि का मांग पर असर दिख रहा है।