Join us

'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 10:18 IST

Indian Bank Savings Scheme: जाणून घ्या कोणती आहे ही बँक आणि कोणती आहे ही स्कीम ज्यामध्ये तुम्हाला निश्चित व्याज मिळणार आहे.

Indian Bank Savings Scheme: सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर उत्तम व्याज देत आहे. इंडियन बँकेत ७ दिवस ते १० वर्षांपर्यंत एफडी करता येते. इंडियन बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, सुधारित एफडी व्याजदर १ ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. आता ही सरकारी बँक एफडीवर २.८० टक्क्यांपासून ७.४५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. आज आपण इंडियन बँकेच्या एका एफडी स्कीमबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये १ लाख रुपये जमा करून १४,६६३ रुपयांचं फिक्स्ड इनकम मिळवता येऊ शकतं.

ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज

इंडियन बँक ४४४ दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर (इंड सिक्युअर प्रॉडक्ट) ७ दिवसांच्या एफडीवर सर्वात कमी २.८० टक्के आणि सामान्य नागरिकांना ६.७० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.२० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना (८० वर्षांवरील लोक) ७.४५ टक्के व्याज देत आहे. ही सरकारी बँक २ वर्षांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना ६.४० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.९० टक्के व्याज देत आहे.

शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी

१४,६६३ रुपयांचं व्याज

जर तुम्ही इंडियन बँकेत २ वर्षांच्या एफडी योजनेत १,००,००० रुपये जमा केले तर सामान्य नागरिकाला मॅच्युरिटीवर एकूण १,१३,५४० रुपये मिळतील. या रकमेत १३,५४० रुपयांचा निश्चित व्याजदर देखील समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि इंडियन बँकेत २ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर तुम्हाला ६.९ टक्के व्याजदरानं एकूण १,१४,६६३ रुपये मिळतील, ज्यामध्ये १४,६६३ रुपयांचा निश्चित व्याजदर समाविष्ट आहे. एफडी योजनेअंतर्गत, ग्राहकांना निश्चित कालावधीनंतर हमी निश्चित व्याज मिळतं.

(टीप- यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसा