Join us

भारताची तिजोरी रिकामी करतोय चीन; दरवर्षी पाठवतोय अब्जो रुपयांची बिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 20:11 IST

India-China : चीनने भारताकडून किती पैसे कमावले? पाहा...

India-China :भारत आणि चीनमधील सीमावाद सर्वश्रृत आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये तणाव सुरू आहे. यामुळे अनेकदा भारतातचीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जाते. पण, दोन्ही देशांमध्ये सीमेवर तणाव असला तरी, व्यापाराच्या बाबतीत चांगले संबंध आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, भारताच्या चीनमधील निर्यातीपेक्षा आयात कैकपटीने जास्त आहे. या द्विपक्षीय व्यापाराची आकडेवारी पाहिली, तर तुम्ही चक्रावून जाल. 

2024 मध्ये व्यवसायात लक्षणीय वाढ होईल2023 मध्ये अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. पण, 2024 मध्ये चीनने हा दर्जा परत मिळवला आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने मे 2024 मध्ये व्यापारासंदर्भात जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2024 मध्ये भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे $118.4 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात (2024-25) एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत, अमेरिकेने व्यापाराच्या बाबतीत चीनला थोड्या फरकाने मागे टाकले आहे. या काळात अमेरिका आणि भारत यांच्यात एकूण 53 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला, तर भारत आणि चीनमधील व्यापार 52.43 अब्ज डॉलर्सचा होता.

चीनने भारताकडून किती पैसे कमवले?चालू आर्थिक वर्षात (2024-25) एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत चीनने भारताला $46.6 अब्ज किमतीचा माल पाठवला आहे. तर, भारताने चीनला 5.7 अब्ज डॉलर्सचा माल पाठवला, जो आयातीच्या केवळ 8 टक्के आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2023-24 मध्ये चीनमधून भारताची आयात $ 101 अब्ज होती. 2023 बद्दल बोलायचे तर, दोन्ही देशांमध्ये 118 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. यामध्ये आयात 101 अब्ज डॉलर्स आणि निर्यात फक्त 16.6 अब्ज डॉलर्सची होती. 

टॅग्स :चीनभारतव्यवसाय