Join us

Post Office मध्ये RD सुरू केली असेल तर करू नका 'ही' चूक, २.७% पर्यंत कमी होऊ शकतं व्याज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:40 IST

आरडी म्हणजे पिगी बँकेसारखी असते. या योजनेत दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळते.

आरडी म्हणजे पिगी बँकेसारखी असते. या योजनेत दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते. मॅच्युरिटीनंतर तुम्हाला व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळते. ज्यांना आपल्या गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नाही आणि छोट्या बचतीतून पैसे जमा करायचे असतील तर त्यांच्यासाठी ही योजना चांगली आहे. बँक आणि पोस्ट ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी रिकरिंग डिपॉझिटचा पर्याय मिळतो.

बँकेतील आरडीची मुदत १ वर्ष ते १० वर्षे आहे, तुम्ही स्वत:नुसार टर्म निवडू शकता. पण पोस्ट ऑफिस आरडी ५ वर्षांची असते. यावर व्याज चांगलं असलं तरी तुम्ही ५ वर्षात चांगला फंड जोडू शकता. सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर ६.७ टक्के व्याज दिलं जात आहे. जर तुम्ही हा आरडी सुरू केली असेल तर चूक करू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होईल. आरडीवरील व्याजदर थेट २.७ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

रतन टाटांच्या आवडत्या व्यक्तीचा 'या' कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, जाणून घ्या कारण

ही चूक करेल नुकसान

जर तुम्ही ५ वर्षांच्या आरडीमध्ये गुंतवणूक केली असेल तर मॅच्युरिटीपूर्वी ती तोडण्याची चूक करू नका. प्री-मॅच्युअर क्लोजर केल्यास आरडीवरील व्याजदर २.७ टक्क्यांपर्यंत कमी होईल. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याइतकं व्याज दिलं जाईल. सध्या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर ४ टक्के व्याज मिळत आहे. त्यानंतर तुम्हाला ६.७% नव्हे तर ४% व्याजाचा परतावा मिळेल.

केव्हा करू शकता प्री-मॅच्युअर क्लोजर?

नियमानुसार पोस्ट ऑफिसआरडी खातं ५ वर्षांनंतर मॅच्युअर होतं, परंतु गरज पडल्यास खातं उघडल्याच्या तारखेपासून तीन वर्षांनंतर आपण ते बंद करू शकता. पण जर तुम्ही मॅच्युरिटी पीरियडच्या एक दिवस आधीच हे खातं बंद केलं तर तुम्हाला पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटइतकं व्याज दिलं जातं. अॅडव्हान्स जमा केलेल्या वेळेच्या आधी खातंबंद करण्याची परवानगी नाही.एक्सटेन्शनचीही सुविधा

जर तुम्हाला पाच वर्षांनंतरही तुमचं आरडी खातं सुरू ठेवायचं असेल तर तुम्ही ते एक्सटेंड करू शकता. यासाठी पोस्ट ऑफिसकडे अर्ज द्यावा लागणार आहे. परंतु आपल्या एक्सटेंडेड आरडी खात्याला तोच व्याज दर दिला जाईल जो उघडण्याच्या वेळी देण्यात आला होता. एक्सटेंडेड खातं केव्हाही बंद केलं जाऊ शकते. परंतु बंद झाल्यावर, पूर्ण वर्षांसाठी, आरडी व्याज दर लागू असेल आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज दर लागू होईल. त्यामुळे मुदतपूर्तीनंतर एक, दोन, तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरच एक्सटेंडेड खातं बंद करण्याचा प्रयत्न करा.

आरडी खातं कोण उघडू शकतं?

१८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसमध्ये स्वत:साठी आरडी खातं उघडू शकतं. त्याचबरोबर पालक मुलांच्या नावानं हे खाते उघडू शकतात. जर मुलांचं वय १० वर्षांपेक्षा जास्त असेल आणि ते समान स्वाक्षरी करू शकत असतील तर ते स्वतःच्या नावानं पोस्ट ऑफिसआरडी खातं उघडू शकतो. याशिवाय दोन ते तीन जण स्वत:साठी आरडीचं जॉइंट अकाऊंटही उघडू शकतात.

टॅग्स :पोस्ट ऑफिसगुंतवणूक