Join us
Daily Top 2Weekly Top 5

Canara Bank मध्ये १८० दिवसांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रुपये मिळतील, पाहा कॅलक्युलेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 14:55 IST

Canara Bank Investment: कॅनरा बँक ही देशातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक असून, ही बँक आपल्या ग्राहकांना मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर देत आहे. पाहूया तुम्हाला किती परतावा मिळू शकतो.

Canara Bank Investment: कॅनरा बँक ही देशातील प्रमुख सरकारी बँकांपैकी एक असून, ही बँक आपल्या ग्राहकांना मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर देत आहे. कॅनरा बँक विविध कालावधीच्या एफडी खात्यांवर ३.०० टक्क्यांपासून ते ७.०० टक्क्यांपर्यंत व्याज देते. या बँकेत ग्राहक किमान ७ दिवसांपासून ते कमाल १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडू शकतात. जर तुम्ही १८० दिवसांच्या एफडी योजनेत २ लाख रुपये गुंतवले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला किती रक्कम मिळेल याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

१८० ते २६९ दिवसांच्या एफडीवरील व्याजदर

कॅनरा बँकेत १८० दिवस ते २६९ दिवसांच्या कालावधीसाठी एफडी खातं उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. या कालावधीसाठी बँक ५.७५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांसाठी ५.२५ टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.७५ टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बँकेच्या ५५५ दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर सर्वाधिक व्याज दिलं जात आहे.

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा आज किती स्वस्त मिळतंय गोल्ड-सिल्व्हर

२ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा

जर एखाद्या सामान्य नागरिकाने १८० दिवसांच्या एफडी योजनेत २ लाख रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर त्याला एकूण २,०५,२११ रुपये मिळतील. यामध्ये ५,२११ रुपयांच्या निश्चित व्याजाचा समावेश आहे. दुसरीकडे, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि १८० दिवसांच्या योजनेत २ लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २,०५,७११ रुपये मिळतील. यामध्ये ५,७११ रुपयांच्या निश्चित व्याजाचा समावेश आहे.

गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय

मुदत ठेव (FD) हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. यामध्ये एका ठराविक काळानंतर तुम्हाला तुमची मूळ रक्कम आणि निश्चित व्याजासह गॅरंटीड परतावा परत मिळतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Canara Bank FD: ₹2,00,000 investment, 180 days, maturity amount calculation.

Web Summary : Canara Bank offers attractive FD rates from 3.00% to 7.00%. A ₹2,00,000 investment for 180 days yields ₹2,05,211 for general citizens and ₹2,05,711 for senior citizens, with interest rates of 5.25% and 5.75% respectively. FDs are considered a safe investment option.
टॅग्स :बँकगुंतवणूकपैसा