Join us

25.75 लाख कोटींच्या संपत्तीसह अंबानी कुटुंब टॉपवर; गौतम अदानी कोणत्या स्थानावर? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 19:45 IST

Hurun India Most Valuable Family Businesses List: हुरुन इंडियाने मोस्ट व्हॅल्यूएबल फॅमिली बिझनेसची यादी जाहीर केली आहे.

India Most Valuable Family Business: हुरुन रिसर्च इंस्टीच्युट (Hurun Research Institute) ने पहिल्यांदाच 2024 मध्ये हुरुन इंडिया मोस्ट व्हॅल्यूएबल फॅमिली बिझनेस (India Most Valuable Family Businesses) ची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब (Ambani Family) 309 बिलियन डॉलर्स (25.75 लाख कोटी रुपये) च्या व्यावसायिक मूल्यासह देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. अंबानी कुटुंबाच्या व्यवसायाची मूल्य भारताच्या GDP च्या 10 टक्के आहे. 

अंबानी कुटुंबानंतर दुसऱ्या स्थानावर बजाज कुटुंब (Bajaj Family) आहे. त्यांच्या व्यवसायाचे मूल्य 7.13 लाख कोटी रुपये आहे. तर, 5.39 लाख कोटी रुपयांच्या मूल्यासह बिर्ला कुटुंब (Birla Family) तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच, पहिल्या पिढीतील व्यवसायिक म्हणून उदयास आलेले अदानी कुटुंब (Adani Family) 15,44,000 कोटींच्या रुपयांच्या व्यावसायिक मूल्यासह पहिल्या स्थानावर आहेत. याशिवाय, 237,100 कोटी रुपयांच्या व्यावसायिक मूल्यासह सीरम इंस्टीच्युट ऑफ इंडियाचे पूनावाला कुटुंब ( Poonawala Family) दुसऱ्या स्थानावर आहे.

या रिपोर्टनुसार, भारताच्या मोस्ट व्हॅल्यूएबल फॅमिली(अंबानी) बिझनेसचे मूल्य 1.3 ट्रिलियन डॉलर असून, हे स्विटजरलंड (Switzerland) आणि संयुक्त अरब अमीरात (UAE)च्या जीडीपीपेक्षाही जास्त आहे. तर, देशातील टॉप 3 मोस्ट व्हॅल्यूएबल फॅमिली बिझनेसचे मूल्य 460 बिलियन डॉलर्स असून, हे सिंगापोर (Singapore) च्या जीडीपीच्या बरोबर आहे. हुरुन इंडिया मोस्ट व्हॅल्यूएबल फॅमिली बिझनेस रिपोर्टनुसार, देशातील 124 बिझनेस कुटुंबाचे मूल्य 1 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सगौतम अदानीबजाज ऑटोमोबाइल