Join us

लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:02 IST

Interest Free Car Loan : तुम्ही जर १५ लाखांचे कर्ज काढून गाडी घेतली तर फक्त व्याजापोटी तुम्हाला जवळपास ५ लाख रुपये भरावे लागतील. पण, ही रक्कम तुम्ही परत मिळवू शकता.

Interest Free Car Loan : आजकाल स्वतःची कार घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं, पण त्यासाठी घेतलेल्या ऑटो लोनवर भरावे लागणारे लाखोंचे व्याज डोकेदुखी ठरते. जर तुम्ही १५,००,००० रुपयांचे कार लोन ८.४० टक्के दराने ७ वर्षांसाठी घेतलं तरी तुम्हाला व्याजापोटी तब्बल ४,८९,००० रुपये भरावे लागतात. पण तुम्हाला माहित आहे का? थोडीशी आर्थिक हुशारी आणि योग्य गुंतवणूक रणनीती वापरून तुम्ही हे कार लोन पूर्णपणे व्याजमुक्त करू शकता! हे स्वप्न वाटत असले तरी, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीचा योग्य वापर केल्यास ही गोष्ट शक्य आहे. चला, हे गणित कसे काम करते, ते समजून घेऊया.

कार लोनवर किती व्याज लागतो?

  • जर तुम्ही १५,००,००० चे कार लोन ७ वर्षांसाठी (८४ महिने) आणि ८.७५% व्याज दराने घेतले, तर
  • मासिक ईएमआय : २३,९४४ रुपये
  • एकूण भरावे लागणारे व्याज : ५,११,२७४ रुपये
  • बँकेला परतफेड केलेली एकूण रक्कम: २०,११,२७४ (मूळ रक्कम + व्याज)
  • याचा अर्थ, तुम्हाला तुमच्या मूळ कर्जाच्या रकमेव्यतिरिक्त ५,११,२७४ रुपये एवढी अतिरिक्त रक्कम फक्त व्याज म्हणून भरावी लागणार आहे.

SIP वापरून व्याजमुक्त लोन कसे करायचे?तुम्ही जर तुमच्या कार लोनवर भरायची असलेली ५,११,२७४ रुपये ही व्याजाची रक्कम परत मिळवली तर याचा अर्थ तुमचे कार लोन पूर्णपणे व्याजमुक्त झाले! ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला लोन सुरू असतानाच दर महिन्याला एक निश्चित रक्कम एसआयपीमध्ये गुंतवावी लागेल.

एसआयपी म्हणजे काय?एसआयपी हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक लोकप्रिय मार्ग आहे, जिथे तुम्ही दर महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवता. म्युच्युअल फंड बाजाराशी जोडलेला असल्याने सरासरी १२% वार्षिक परतावा मिळू शकतो. या अंदाजित परताव्याचा वापर करून आपण आपले गणित मांडूया.

'व्याज रिकव्हर' करण्याचा फॉर्म्युला**तुम्हाला भरायचे असलेले ५,११,२७४ रुपयांचे व्याज परत मिळवण्यासाठी तुम्ही ७ वर्षांपर्यंत किती SIP करायला हवी?

गुंतवणुकीचा कालावधी अपेक्षित परतावा दरमासिक SIP रक्कम७ वर्षांनंतर मिळणारी अंदाजित रक्कम
७ वर्षे (८४ महिने)१२% वार्षिक११,००० रुपये५,२७,७६९ रुपये

गुंतवणुकीचे गणित

  • जर तुम्ही दरमहा ११,००० रुपयांची एसआयपी ७ वर्षांसाठी केली, तर तुमची एकूण गुंतवणूक ९,२४,००० रुपये होईल.
  • या गुंतवणुकीवर १२% परतावा गृहीत धरल्यास, तुम्हाला ७ वर्षांनंतर ५,२७,७६९ रुपये इतका फायदा होईल.
  • हा फायदा (५,२७,७६९ रुपये) तुमच्या कार लोनवरील व्याजाच्या रकमेपेक्षा (५,११,२७४) जास्त आहे!
  • याचा अर्थ, तुम्ही ११,००० रुपयांची एसआयपी करून मिळवलेल्या परताव्यामुळे तुमचे कार लोन प्रभावीपणे 'व्याजमुक्त' झाले आहे. तुमच्या मूळ रकमेवर तुम्हाला अतिरिक्त फायदाही मिळू शकतो!

वाचा - आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Eliminate car loan interest: Smart investment strategy revealed!

Web Summary : Pay off your car loan interest-free! By investing in SIPs matching interest payments, your loan becomes effectively interest-free. A ₹11,000 monthly SIP over 7 years, yielding 12%, can offset ₹5,11,274 interest, turning debt into potential profit.
टॅग्स :गुंतवणूकशेअर बाजारकारस्टॉक मार्केट