Smart Investing : श्रीमंत होण्यासाठी फक्त पैसे कमावणे महत्त्वाचे नाही तर हुशारीने गुंतवणूक करूनही तुम्ही श्रीमंत होऊ शकता. गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय असले तरी, आजकाल म्युच्युअल फंड एसआयपी हा सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी मार्ग बनला आहे. या पद्धतीत तुम्ही कमी पैसे गुंतवूनही दीर्घकाळात मोठा निधी तयार करू शकता. यासाठी तुम्हाला खूप पैसेही गुंतवण्याची आवश्यकता नाही.
दरमहा फक्त ५०० रुपयांची गुंतवणूक
- तुम्ही दरमहा फक्त ५०० रुपये म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवल्यास, दीर्घकाळात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो.
- २० वर्षांसाठी गुंतवणूक : जर तुम्ही दरमहा ५०० गुंतवले, तर २० वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक १.२० लाख होईल. सरासरी १२% परतावा गृहीत धरल्यास, तुम्हाला २० वर्षांनंतर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकते.
- ३० वर्षांसाठी गुंतवणूक: जर तुम्ही हा कालावधी ३० वर्षांपर्यंत वाढवला, तर तुमची एकूण गुंतवणूक १.८० लाख होईल. १२% सरासरी परताव्याने तुम्हाला ३० वर्षांनंतर १५.४० लाख रुपये मिळू शकतात. यातला १३.६० लाख रुपये हा केवळ नफा असेल.
जास्त परतावा मिळाल्यास काय होईल?जर बाजाराच्या चांगल्या कामगिरीमुळे तुम्हाला १५% पर्यंत परतावा मिळाला, तर तुमची कमाई आणखी वाढेल.३० वर्षांत १५% परतावा: दरमहा ५०० रुपयांच्या गुंतवणुकीवर, १५% परताव्याने तुम्हाला ३० वर्षांनंतर २८.१५ लाख रुपये मिळतील. यातला २६.३५ लाख रुपये हा निव्वळ नफा असेल.
एसआयपीचे फायदे काय?
- कमी जोखीम : शेअर बाजार अस्थिर असला तरी, एसआयपीमध्ये तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करत असल्यामुळे बाजारातील चढ-उतारांचा धोका कमी होतो.
- शिस्तबद्ध गुंतवणूक : एसआयपी तुम्हाला दरमहा नियमित गुंतवणूक करण्याची सवय लावते. यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने मोठा निधी जमा होतो.
- चक्रवाढ व्याजाचा फायदा : एसआयपीमध्ये तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या नफ्यावरही नफा मिळतो. यालाच चक्रवाढ व्याज म्हणतात, ज्यामुळे तुमचा पैसा वेगाने वाढतो.
वाचा - वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
यामुळे, दरमहा छोटी बचत करूनही तुम्ही दीर्घकाळात मोठे आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करू शकता. मात्र, कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. कारण, शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधिन असते.