Join us

पंजाब किंग्जची मालकीण; IPL मधून प्रीती झिंटा किती कमावते? जाणून घ्या संपत्ती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 16:31 IST

Preity Zinta Income: अभिनेत्री प्रीती झिंटाचा संघ पंजाब किंग्स IPL च्या अंतिम फेरीत पोचला आहे.

Preity Zinta Income: अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या IPL मुळे खूप चर्चेत आहे. प्रीतीची टीम पंजाब किंग्ज IPL च्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. प्रीती अतिशय लक्झरी लाइफस्टाइल जगते. IPL सह विविध ब्रँड एंडोर्समेंटमधून प्रीतीची खूप कमाई होते.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रीती झिंटाची एकूण संपत्ती १८३ कोटी आहे. ती अभिनय, व्यवसायिक करार आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई करते. प्रीती ब्रँड एंडोर्समेंटसाठी सूमारे १.५ कोटी रुपये घेते.

IPL मध्येही गुंतवणूकप्रीती झिंटा २००८ मध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्जची सह-मालक बनली. मनी कंट्रोलनुसार, प्रीतीने त्यावेळी ३५ कोटींची गुंतवणूक केली होती, जी आता ३५० कोटींवर पोहोचली आहे. २००८ मध्ये जेव्हा पंजाब किंग्जला ७६ मिलियन डॉलर्समध्ये खरेदी करण्यात आले होते. २०२२ पर्यंत या संघाची किंमत $९२५ मिलयन झाली.

IPL संघ मालक अशा प्रकारे कमावतातसंघ मालक विविध ब्रँड एंडोर्समेंटमधून आपली कमाई करतात. बीसीसीआयकडूनही त्यांना चांगली रक्कम मिळते. याशिवाय, आयपीएलमधील तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या कमाईतही संघांच्या मालकांचा वाटा असतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिकीट विक्रीचा ८० टक्के भाग संघ मालकांच्या खात्यात जातो. 

प्रीती झिंटाची संपत्ती

प्रीती झिंटा अनेक मालमत्तांची मालक आहेत. हाऊसिंग डॉट कॉमच्या मते, प्रीती झिंटाचे मुंबईतील पाली हिल्स परिसरात १७.०१ कोटी रुपयांचे अपार्टमेंट आहे. तिचे मूळ गाव शिमला येथेही एक घर आहे, ज्याची किंमत सुमारे ७ कोटी रुपये आहे. लग्नानंतर प्रीती लॉस एंजेलिसला शिफ्ट झाली. ती तिचा पती जीन गुडइनफसोबत तिथे राहते. बेव्हरली हिल्समध्ये तिचे मोठे घर आहे.

प्रीती झिंटाचे कार कलेक्शनप्रीती झिंटाला लक्झरी कारचीदेखील आवड आहे. तिच्याकडे लेक्सस एलएक्स ४०० क्रॉसओवर आहे. याशिवाय तिच्याकडे पोर्शे, मर्सिडीज बेंझ ई क्लास आणि बीएमडब्ल्यूदेखील आहे.

टॅग्स :प्रीती झिंटाआयपीएल २०२४व्यवसायगुंतवणूक