Gratuity New Rule: केंद्र सरकारच्या नवीन लेबर कोडनुसार ग्रॅच्युटी (Gratuity) नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या बदलानुसार फिक्स्ड-टर्म एम्प्लॉयी (FTE) म्हणजे ठराविक कालावधीच्या करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता ग्रॅच्युटीसाठी ५ वर्षे पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही. फक्त १ वर्षाची सलग सेवा पूर्ण केल्यानंतर ते ग्रॅच्युटीसाठी पात्र ठरणार आहेत.
फिक्स्ड-टर्म कर्मचारी म्हणजे काय?
पूर्वी कंपन्या कॉन्ट्रॅक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देत नव्हत्या. मात्र आता ‘फिक्स्ड-टर्म’ प्रणालीअंतर्गत १ किंवा २ वर्षांच्या लिखित करारावर नियुक्त केलेले कर्मचारी थेट कंपनीच्या पेरोलवर असतील. यामुळे त्यांना पगार, रजा, भत्ते आणि इतर सुविधा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळतील.
५ वर्षांऐवजी १ वर्षात ग्रॅच्युटी
सध्या लागू असलेल्या ग्रॅच्युटी कायद्यानुसार कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटी मिळण्यासाठी ५ वर्षांची सेवा आवश्यक असते. मात्र फिक्स्ड-टर्म कर्मचाऱ्यांसाठी हा नियम बदलण्यात आला आहे. किमान १ वर्ष सेवा पूर्ण करणे आवश्यक असेल. म्हणजेच, एका वर्षानंतर प्रत्येक महिन्याची ग्रॅच्युटी मिळणार आहे. उदाहरण: १ वर्ष ५ महिने काम केल्यास १७ महिन्यांची ग्रॅच्युटी मिळेल. हा बदल प्रोजेक्ट बेस्ड किंवा करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
नियम का बदलले?
लहान कालावधीच्या प्रोजेक्ट्सवर किंवा १-२ वर्षांच्या करारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेनुसार आर्थिक लाभ मिळावा, यासाठी सरकारने नियम बदलले आहेत. यामुळे अशा कर्मचाऱ्यांना ५ वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार नाही.
बेसिक सॅलरी वाढणार, PF आणि ग्रॅच्युटी वाढणार
नवीन लेबर कोडनुसार, कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी ही CTC च्या किमान ५०% असावी. HRA, Travel Allowance यांसारखे भत्ते ५०% पेक्षा जास्त असू शकत नाहीत. भत्ते ५०% पेक्षा जास्त असल्यास उर्वरित रक्कम बेसिक सॅलरीमध्ये जोडली जाईल. यामुळे बेसिक सॅलरी वाढेल, PF (Provident Fund) रक्कम वाढेल, ग्रॅच्युटी रक्कम देखील वाढेल आणि फुल अँड फायनल सेटलमेंटदेखील ४८ तासांत होईल. सध्या कंपन्या कर्मचारी नोकरी सोडल्यानंतर फुल अँड फायनल सेटलमेंटसाठी ३० ते ६० दिवस घेतात.
Web Summary : New labor codes allow fixed-term employees to receive gratuity after just one year of service, instead of five. Basic salary will increase to at least 50% of CTC, boosting PF and gratuity amounts. Full and final settlement will be completed within 48 hours.
Web Summary : नए श्रम कानूनों के तहत, निश्चित अवधि के कर्मचारियों को अब पांच साल के बजाय केवल एक साल की सेवा के बाद ग्रेच्युटी मिलेगी। मूल वेतन CTC का कम से कम 50% होगा, जिससे PF और ग्रेच्युटी राशि बढ़ेगी। पूर्ण और अंतिम निपटान 48 घंटों के भीतर पूरा किया जाएगा।