Gold Silver Price Today 31 Dec 2025: एमसीएक्स (MCX) नंतर आता सराफा बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट झाली आहे. आज चांदीचा भाव २,८९६ रुपयांनी घसरुन २,२९,४३३ रुपये प्रति किलोवर आला आहे. विशेष म्हणजे, एमसीएक्समध्ये आज चांदी १५,००० रुपयांपेक्षा जास्त घसरली आहे. दुसरीकडे, बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम १,५०० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. जीएसटीसह चांदीचा दर आता २,३६,३१५ रुपये प्रति किलो झाला आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,३७,०९१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय.
किमतीतील चढ-उतार आणि ऐतिहासिक उच्चांक
मंगळवारी चांदी जीएसटीशिवाय २,३२,१२९ रुपयांवर बंद झाली होती. त्याचप्रमाणे सोनं जीएसटीशिवाय १,३६,७८१ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. आज विना जीएसटी सोन्याचा भाव १,३४,५९९ रुपयांवर बंद झाला. २९ डिसेंबर रोजी सोन्यानं १,३८,१८१ रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, त्या तुलनेत आता सोनं ५,०६२ रुपयांनी स्वस्त झालं आहे. तसंच चांदी आपल्या २,४३,४८३ रुपयांच्या सर्वोच्च स्तरावरून १४,००५ रुपयांनी खाली आली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे हे दर दिवसातून दोनदा जारी केले जातात.
या वर्षातील आणि डिसेंबरमधील वाढ
या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत ५७,३५९ रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदी १,४३,४१४ रुपयांनी वधारली आहे. केवळ डिसेंबर महिन्यात आतापर्यंत चांदी ६७,९७० रुपयांनी आणि सोनं ८,००८ रुपयांनी महागलं आहे. सोमवारी आणि आज झालेल्या मोठ्या घसरणीनंतरही या वर्षातील एकूण दरवाढीचा आकडा मोठा आहे.
कॅरेटनुसार सोन्याचे ताजे दर (विना मेकिंग चार्ज)
आज सोन्याच्या विविध कॅरेटनुसार किमती खालीलप्रमाणे आहेत:
- २३ कॅरेट गोल्ड: १,४९४ रुपयांच्या घसरणीसह १,३३,०९९ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह याची किंमत १,३७,०९१ रुपये झाली आहे.
- २२ कॅरेट गोल्ड: १,३७४ रुपयांनी घसरून १,२१,९१९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे. जीएसटीसह हा दर १,२५,५७६ रुपये झाली.
- १८ कॅरेट गोल्ड: १,३७४ रुपयांच्या घसरणीसह ९९,८२४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले असून जीएसटीसह याची किंमत १,०२,८१८ रुपये झाली.
- १४ कॅरेट गोल्ड: ८७७ रुपयांनी स्वस्त होऊन ७७,८६३ रुपयांवर उघडलं आणि जीएसटीसह ८०,१९८ रुपयांवर पोहोचले आहेत.
Web Summary : Gold and silver prices sharply declined in the bullion market. Silver fell by ₹2,896 to ₹2,29,433 per kg. Gold decreased by ₹1,500 per 10 grams, now ₹1,37,091 with GST. Despite this, gold has increased ₹57,359 and silver ₹1,43,414 this year.
Web Summary : सराफा बाजार में सोना और चांदी की कीमतों में भारी गिरावट आई। चांदी ₹2,896 गिरकर ₹2,29,433 प्रति किलो हो गई। सोने में ₹1,500 प्रति 10 ग्राम की गिरावट आई, अब जीएसटी के साथ ₹1,37,091 है। इसके बावजूद, इस साल सोने में ₹57,359 और चांदी में ₹1,43,414 की वृद्धि हुई है।