Gold-Silver Weekly Price: नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, या आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाली, तर चांदीच्या किमतीतही घट दिसून आली. पाच दिवसांच्या व्यवहारादरम्यान सोनं प्रति १० ग्रॅम १९९० रुपयांनी स्वस्त झालं. तर चांदीच्या दरात आठवडाभरात ८९० रुपयांची घसरण झाली.
२९ डिसेंबर रोजी सोनं १,३६,७८१ रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर होतं. त्यानंतर सलग ३ दिवस घसरण पाहायला मिळाली आणि ३१ डिसेंबरपर्यंत हे दर १,३३,१९५ रुपयांवर आले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी थोड्या वाढीनंतर, २ जानेवारी रोजी सोनं १,३४,७८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं. एकूणच, आठवडाभरात सोनं प्रति १० ग्रॅम १,९९९ रुपयांनी स्वस्त झालं.
दुसरीकडे, २९ डिसेंबर रोजी चांदी २,३५,४४० रुपये प्रति किलो होती, परंतु १ जानेवारीपर्यंत ती घसरून २,२९,२५० रुपयांवर आली. त्यानंतर २ जानेवारी रोजी चांदीने जोरदार पुनरागमन केलं आणि भाव २,३४,५५० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले. संपूर्ण आठवड्याचा विचार करता चांदी प्रति किलो ८९० रुपयांनी कमकुवत राहिली.
IBJA कडून जारी केलेले दर देशभरात ग्राह्य
इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन दररोज सोने आणि चांदीच्या किमतींची माहिती देते. आयबीजेएने जारी केलेले दर देशभरात सर्वमान्य आहेत, परंतु या किमतींमध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नसतो.
गेल्या एका आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले (९९९ शुद्धता)
२९ डिसेंबर, २०२५: १,३६,७८१ रुपये प्रति १० ग्रॅम
३० डिसेंबर, २०२५: १,३४,५९९ रुपये प्रति १० ग्रॅम
३१ डिसेंबर, २०२५: १,३३,१९५ रुपये प्रति १० ग्रॅम
०१ जानेवारी, २०२६: १,३३,४६१ रुपये प्रति १० ग्रॅम
०२ जानेवारी, २०२६: १,३४,७८२ रुपये प्रति १० ग्रॅम
गेल्या एका आठवड्यात चांदीचे दर किती बदलले (९९९ शुद्धता)
२९ डिसेंबर, २०२५: २,३५,४४० रुपये प्रति किलो
३० डिसेंबर, २०२५: २,३१,३२९ रुपये प्रति किलो
३१ डिसेंबर, २०२५: २,३०,४२० रुपये प्रति किलो
०१ जानेवारी, २०२६: २,२९,२५० रुपये प्रति किलो
०२ जानेवारी, २०२६: २,३४,५५० रुपये प्रति किलो
Web Summary : Gold prices fell ₹1999 per 10 grams, silver decreased ₹890 per kg this week. Prices fluctuated, with a slight recovery for silver on January 2nd. IBJA rates are followed nationwide.
Web Summary : इस सप्ताह सोने की कीमतों में ₹1999 प्रति 10 ग्राम की गिरावट आई, चांदी में ₹890 प्रति किलो की कमी आई। कीमतों में उतार-चढ़ाव रहा, 2 जनवरी को चांदी में थोड़ी सुधार हुआ। आईबीजेए की दरें देशभर में मान्य हैं।