Gold Silver Price 13 Jan.: सराफा बाजारात आजही चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे, तर सोन्याच्या दरात किरकोळ वाढ दिसून आली. या दोन्ही मौल्यवान धातूंनी आज पुन्हा एक नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. चांदीच्या किमतीत एका झटक्यात ५,९७१ रुपयांची वाढ झाली, तर सोनं केवळ २५ रुपयांनी महागलं. या दरवाढीसह, नवीन वर्षाच्या अवघ्या १३ दिवसांत चांदी ३२,३२७ रुपयांनी वधारली आहे, तर सोनं ७,२८७ रुपयांनी महाग झालंय.
आजचे ताजे दर
आज जीएसटीशिवाय चांदीचा भाव २,५७,२८३ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. जीएसटीसह चांदी आता २,७०,६२९ रुपये प्रति किलोवर गेली आहे. दुसरीकडे, २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,४४,६९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीशिवाय आज सोन्याचा भाव १,४०,४८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. सोमवारी जीएसटीशिवाय चांदी २५६,७७६ रुपयांवर आणि सोनं १४०,४४९ रुपयांवर बंद झालं होतं. सध्या सोनं आणि चांदी दोन्ही विना जीएसटी 'ऑल टाइम हाय' स्तरावर आहेत. हे दर आयबीजेए (IBJA) द्वारे जाहीर करण्यात आलेत. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते.
कॅरेटनुसार सोन्याचे भाव
२३ कॅरेट गोल्ड: केवळ ३२ रुपयांच्या वाढीसह १३९,९१९ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. जीएसटीसह याची किंमत आता १४४,११६ रुपये झाली आहे. यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.
२२ कॅरेट गोल्ड: ३१ रुपयांनी महाग होऊन १२८,६८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं. जीएसटीसह हा दर १३२,५४२ रुपये झालाय.
१८ कॅरेट गोल्ड: २५ रुपयांची तेजी दिसून आली असून आज १०५,३६२ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. जीएसटीसह याची किंमत १०८,५२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली.
१४ कॅरेट गोल्ड: या दरात १९ रुपयांची वाढ झाली असून आज ८२,१८२ रुपयांवर उघडलं. जीएसटीसह याचे दर ८४,६४७ रुपयांवर आलेत.
Web Summary : Gold and silver prices hit record highs. In 13 days, silver jumped ₹32,327, gold rose ₹7,287. Today, silver is at ₹2,70,629/kg with GST, gold (24 Carat) at ₹1,44,690/10 grams with GST.
Web Summary : सोना और चांदी की कीमतें रिकॉर्ड ऊंचाई पर पहुंचीं। 13 दिनों में, चांदी ₹32,327 बढ़ी, सोना ₹7,287 बढ़ा। आज, चांदी जीएसटी के साथ ₹2,70,629/किलो और सोना (24 कैरेट) जीएसटी के साथ ₹1,44,690/10 ग्राम पर है।