Gold Price Today: २२ सप्टेंबरपासून नवरात्र सुरू होत आहे आणि त्यानंतर अनेक सण आहेत. आज सोमवार ८ सप्टेंबर रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कमकुवत ट्रेंडमध्ये गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकिंगमुळे सोमवारी देशांतर्गत वायदा बाजारात सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावरून १,०७,१२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX), ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा वायदा भाव १,०७,१२२ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो ६०६ रुपयांनी किंवा ०.५६ टक्क्यांनी कमी झाला. शुक्रवारी, त्यानं १,०७,८०७ रुपये प्रति १० ग्रॅमचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्याचप्रमाणे, डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा वायदा भाव ६१२ रुपयांनी घसरून १,०८,१७६ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला.
चांदीचे दरही घसरले
गेल्या आठवड्यात नवीन उच्चांक गाठल्यानंतर चांदीतही घसरण झाली. डिसेंबर डिलिव्हरीसाठी चांदीचा वायदा भाव ९७७ रुपये किंवा ०.७८ टक्क्यांनी घसरून १,२३,७२० रुपये प्रति किलो झाला. ३ सप्टेंबर रोजी चांदीनं १,२६,३०० रुपये प्रति किलोचा विक्रमी उच्चांक गाठला होता.
अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली
IBJA चे नवे दर काय?
IBJA नुसार, आज ९९९ शुद्धतेचं सोनं ९७४ रुपयांनी महागलं आहे. शुक्रवारी यापूर्वी सोन्याचा भाव १०६३३८ रुपये प्रति १० ग्रॅम होता, आज सोमवारी त्याची किंमत १०७३१२ रुपयांवर आली आहे. त्याच वेळी, चांदी देखील आज १९८ रुपयांनी महागली आहे. आज एक किलो चांदीची किंमत १२३३६८ रुपयांवर आली आहे.
परदेशातील बाजारात, सोमवारी कॉमेक्सवर डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा वायदा ०.६८ टक्क्यांनी घसरून ३,६२८.३५ डॉलर प्रति औंस झाला. मागील सत्रात, तो ३,६५५.५० डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. जागतिक बाजारात, स्पॉट गोल्ड ३,५८४.४० डॉलर प्रति औंसवर आला.