Gold Silver Rate Today On MCX: सोन्या आणि चांदीच्या किमतीत दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सुरुवातीच्या व्यवहारात चांदीच्या किमतीत ५,००० रुपयांहून अधिक वाढ झाली आहे, तर सोनंदेखील १,५०० रुपयांपेक्षा जास्त महाग झालंय.
५ मार्चच्या डिलिव्हरीसाठीची चांदी मागील सत्रात २,२८,७८३ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती, जी आज २,३२,९२९ रुपयांवर उघडली. सुरुवातीच्या व्यवहारात ही चांदी ५,०८७ रुपयांच्या वाढीसह २,३३,८७० रुपयांपर्यंत पोहोचली होती. सकाळी ९:२७ च्या सुमारास चांदी ४,९६२ रुपयांच्या वाढीसह २,३३,७४५ रुपयांवर व्यापार करत होती.
सोन्याच्या किमतीत १ टक्क्यांहून अधिक वाढ
चांदीसोबतच सोन्याच्या किमतीतही आज तेजी दिसून आली आहे. एमसीएक्सवर २ एप्रिलच्या डिलिव्हरीसाठीचे सोनं मागील सत्रात १,५१,४१८ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं आणि आज ते १,५३,३०३ रुपयांवर उघडलं. सुरुवातीच्या सत्रात सोन्याचा दर १,८८८ रुपयांच्या वाढीसह १,५३,३०३ रुपयांपर्यंत पोहोचला. सकाळी ९:३० वाजता सोने १,५३३ रुपये म्हणजेच १.०१ टक्क्यांच्या वाढीसह १,५२,९५१ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होतं.
Ola Electric चे फाऊंडर भाविश अग्रवाल यांना अटक होणार का; नक्की काय आहे प्रकरण?
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती आणि तज्ज्ञांचं मत
देशांतर्गत बाजारात तेजी असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं ०.२ टक्क्यांच्या घसरणीसह ४,८६७ डॉलर्स प्रति औंसवर होतं, तर चांदीदेखील ०.२ टक्क्यांच्या घसरणीसह ७३.३० डॉलर्स प्रति औंसवर व्यापार करत होती. डॉलर मजबूत झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या मौल्यवान धातूंच्या किमतीत घट झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. तसंच अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होण्याचे संकेत मिळाल्यानं गुंतवणूकदार सध्या सावध भूमिकेत आहेत.
Web Summary : After a two-day fall, silver prices jumped by ₹5,000 on MCX, while gold also saw an increase. International markets saw a decline due to a stronger dollar and easing US-Iran tensions.
Web Summary : दो दिन की गिरावट के बाद, एमसीएक्स पर चांदी की कीमतों में ₹5,000 की वृद्धि हुई, जबकि सोने में भी उछाल आया। मजबूत डॉलर और अमेरिका-ईरान के बीच तनाव कम होने से अंतरराष्ट्रीय बाजारों में गिरावट आई।