Join us
Daily Top 2Weekly Top 5

घसरणीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Silver ११५००, तर Gold २६०० रुपयांपेक्षा अधिक महागलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 10:26 IST

Gold Silver Rate Today On MCX: मोठ्या घसरणीनंतर आता सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. जाणून घ्या काय आहेत नवे दर.

Gold Silver Rate Today On MCX: आज आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केट 'कॉमेक्स' (COMEX) प्रमाणेच भारतीय मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोनं आणि चांदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. MCX वर बाजार उघडताच सोन्याच्या दरात १.४५% ची वाढ झाली असून तो १,५७,७०३ रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचला आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव १,५५,०५० रुपयांवर बंद झाला होता.

चांदीच्या दरात विक्रमी वाढ

सोन्यापेक्षाही जास्त तेजी आज चांदीच्या किमतीत दिसून येत आहे. चांदीचा दर ४% नं वधारून २,६१,००० रुपये प्रति किलो वर पोहोचला. शुक्रवारी चांदीचा दर २,४९,४९९ रुपये प्रति किलो होता. बाजार उघडताच चांदीच्या किमतीत तब्बल ११,५०१ रुपये प्रति किलोची वाढ नोंदवण्यात आली, तर सोन्याच्या किमतीत प्रति दहा ग्रॅम २,६५३ रुपयांची वाढ झाली आहे.

झोपेतच नशीब चमकलं! अचानक खात्यात ट्रान्सफर झाले ₹१५०००००००००० चे बिटकॉइन; २४९ लोक बनले श्रीमंत, प्रकरण काय?

आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती

आंतरराष्ट्रीय मार्केट 'कॉमेक्स' वर बाजार उघडल्यानंतर सोन्याचा दर ५,०४६.९० डॉलर प्रति औंस आणि चांदीचा दर ७९.३८५ डॉलर प्रति औंसवर पोहोचला होता. मात्र, ताज्या आकडेवारीनुसार, सोन्याचा भाव ५,०३३.३० डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव ८०.६४५ डॉलर प्रति औंस झालाय.

गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्ह बँकेच्या नवीन अध्यक्षपदासाठी केविन वॉर्श (Kevin Warsh) यांच्या नावाला पसंती दिल्यापासून बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना आता सोने-चांदी खरेदी करावी, विकावी की आहे तशीच ठेवावी, हे समजत नाहीये.

तज्ज्ञांचे मत आणि भविष्यातील अंदाज

'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करून सांगितले आहे की, त्यांनी सध्या सोने, चांदी आणि बिटकॉइन खरेदी करणं बंद केले असून ते आणखी मोठ्या घसरणीची वाट पाहत आहेत. त्यांच्या या विधानानंतर कमोडिटी मार्केटमध्ये आगामी काळात मोठी घसरण होणार का, अशी भीती गुंतवणूकदारांना सतावत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold and Silver Prices Surge After Decline: A Sharp Rebound

Web Summary : Gold and silver prices rebounded sharply on MCX. Gold rose 1.45% to ₹1,57,703 per 10 grams, while silver jumped 4% to ₹2,61,000 per kg. Market volatility persists amid uncertainty over Federal Reserve leadership and investor sentiment.
टॅग्स :सोनंचांदी