Gold-Silver Price Today 2 March 2026: इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाची झळ सोन्याच्या किमतींना बसली आहे. IBJA ने जारी केलेल्या दरांनुसार, आज २ मार्च रोजी ९९९ शुद्धतेचं सोनं शुक्रवारी बंद झालेल्या दराच्या तुलनेत ७,३७२ रुपये प्रति १० ग्रॅमनं महागलं असून ते जीएसटीशिवाय १,६६,४६९ रुपयांवर पोहोचलंय. या दरानुसार, आता सोनं सराफा बाजारातील आपल्या १,७६,१२१ रुपयांच्या 'ऑल टाइम हाय' पेक्षा केवळ ९,६५२ रुपयांनी स्वस्त राहिलंय. जीएसटीसह सोन्याचा दर आज १,७१,४६३ रुपयांवर पोहोचला आहे.
चांदीची २० हजार रुपयांची मोठी उडी
IBJA नुसार, आज सोमवार २ मार्च रोजी चांदी २०,२३६ रुपयांच्या मोठ्या उडीसह जीएसटीशिवाय २,८६,९३६ रुपये प्रति किलो दरानं उघडली. जीएसटीसह चांदीचा दर २.९५ लाखांच्या पार गेला आहे. २९ जानेवारी रोजी सराफा बाजारात चांदीनं ३८५,९३३ रुपये प्रति किलो हा 'ऑल टाइम हाय' स्तर गाठला होता, त्या तुलनेत चांदी अजूनही ९८,९९७ रुपये प्रति किलोनं स्वस्त आहे. अनेक शहरांमध्ये चांदी ३,००,००० रुपयांच्या अत्यंत जवळ पोहोचली आहे.
पाकिस्तानच्या शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण, एका तासासाठी थांबवावं लागलं ट्रेडिंग
MCX वरील दर
MCX वर एप्रिल फ्युचर कॉन्ट्रॅक्टसाठी सोन्याचा दर ३,३९७ रुपये किंवा २.०९% वाढून १,६५,५०१ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला, तर मागील बंद भाव १,६२,१०४ रुपये होता. सोन्याच्या किमती ३.५% वाढून १,६६,९२० रुपयांच्या उच्च पातळीवर पोहोचल्या.
आंतरराष्ट्रीय बाजारातील दर
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पॉट गोल्डची किंमत १% वाढून ५,३२९.३९ डॉलर प्रति औंस झाली आहे, जी गेल्या चार आठवड्यांतील सर्वोच्च पातळी आहे. अमेरिकन गोल्ड फ्युचर १.८% वाढून ५,३४२.८० डॉलर प्रति औंस झालं. तसंच, चांदीच्या किमती २.८% वाढून ९६.४ डॉलर प्रति औंसवर पोहोचल्यात.
Web Summary : Gold prices soar over ₹7,000, silver jumps by ₹20,000 amid global tensions. Gold is nearing all-time highs. Silver is still below its peak. MCX gold futures also see a significant rise. International spot gold hits a four-week high.
Web Summary : वैश्विक तनाव के बीच सोने की कीमतों में ₹7,000 से अधिक और चांदी में ₹20,000 की उछाल। सोना सर्वकालिक उच्च स्तर के करीब। चांदी अभी भी अपने शिखर से नीचे है। एमसीएक्स सोना वायदा में भी महत्वपूर्ण वृद्धि देखी गई। अंतर्राष्ट्रीय स्पॉट गोल्ड चार सप्ताह के उच्च स्तर पर।