Gold Silver Price Today 4 Feb 2026: सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण होईल या अपेक्षेने थांबलेल्या ग्राहकांना आज मोठा झटका बसला आहे. विशेषतः लग्नसराईसाठी खरेदी करू इच्छिणाऱ्यांची प्रतीक्षा महाग पडली आहे. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ६,६२९ रुपयांची वाढ झाली, तर चांदीच्या दरात १२,५७३ रुपयांची मोठी उसळी पाहायला मिळाली.
आजचे ताजे दर (विना जीएसटी)
आज बाजार उघडताना सोन्याचा दर (जीएसटीशिवाय) १,५८,१५८ रुपये प्रति १० ग्रॅम होता, तर चांदी २,७६,५३८ रुपये प्रति किलोवर उघडली. जीएसटीसह विचार केल्यास, सोन्याची किंमत १,६२,९०२ रुपये आणि चांदी २,८४,८३४ रुपयांवर पोहोचली आहे. प्लॅटिनमच्या दरातही २,५४८ रुपयांची वाढ झाली असून तो ७२,६७२ रुपयांवर पोहोचला आहे. मंगळवारी बाजार बंद होताना चांदी २,६३,९६५ रुपये आणि सोनं १,५१,५२९ रुपये (विना जीएसटी) होतं.
मोदी-जिनपिंग भेटीनं परिस्थिती बदलली! चीन-भारताची जवळीक वाढली, अनेक आघाड्यांवर यश
उच्चांकाच्या तुलनेत सध्याची स्थिती
सध्याचे दर वाढलेले असले तरी, सोने त्याच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवरुन (१,७६,१२१ रुपये) अजूनही १७,९६३ रुपयांनी स्वस्त आहे. तसंच, चांदी २९ जानेवारीच्या सर्वोच्च उच्चांकावरून (३,८५,९३३ रुपये) १,०९,३९५ रुपयांनी स्वस्त मिळत आहे. 'आयबीजेए' (IBJA) द्वारे हे दर जाहीर करण्यात आले आहेत.
१८ आणि २२ कॅरेट सोन्याचे भाव
२२ कॅरेट सोन्याच्या दरात ६,०७२ रुपयांची वाढ झाली असून तो १,४४,८७३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे (जीएसटीसह १,४९,२१९ रुपये). १८ कॅरेट सोन्यामध्ये ६,६०३ रुपयांची वाढ झाली असून, तो १,१८,६१९ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला (जीएसटीसह १,२२,१७७ रुपये).
१४ आणि २३ कॅरेट सोन्याचे भाव
१४ कॅरेट सोन्याचा दर ३,८७५ रुपयांनी वधारून ९२,५२२ रुपयांवर पोहोचला आहे जीएसटीसह तो ९५,२९७ रुपयांवर आला. तसंच २३ कॅरेट सोन्याच्या किमतीत ६,६०३ रुपयांची वाढ होऊन तो १,५७,५२५ रुपयांवर उघडला आणि जीएसटीसह १,६२,२५० रुपयांवर आला.
दरवाढीचं कारण काय?
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मौल्यवान धातूंमधील मोठ्या प्रमाणात होणारं फोर्स सेलिंग आता थांबलं आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या आठवड्यातील मोठ्या चढ-उतारामुळे लहान गुंतवणूकदार सध्या बाजारापासून लांब राहिले आहेत, जे खरेदीदारांचा एक मोठा हिस्सा असतात.
Web Summary : Gold and silver prices jumped sharply, dashing hopes of a price drop. Gold rose by ₹6,600 and silver by ₹12,500. Despite the surge, gold and silver are still below their all-time highs. Experts say force selling of metals has stopped.
Web Summary : सोना और चांदी की कीमतों में भारी उछाल आया, जिससे गिरावट की उम्मीद कर रहे खरीदारों को निराशा हुई। सोने में ₹6,600 और चांदी में ₹12,500 की वृद्धि हुई। इस उछाल के बावजूद, सोना और चांदी अभी भी अपने सर्वकालिक उच्च स्तर से नीचे हैं। विशेषज्ञों का कहना है कि धातुओं की जबरन बिक्री रुक गई है।