Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: ऐतिहासिक तेजीनंतर सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर आपटले; सोनं ₹६८६५, चांदी २२,८२५ नं झाली स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 14:12 IST

Gold Silver Price 30 Jan: लग्नाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्राफा बाजारात विक्रमी दरवाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली.

Gold Silver Rate Today 30 Jan: लग्नाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्राफा बाजारात विक्रमी दरवाढीनंतर आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. गुरुवारच्या बंद दराच्या तुलनेत २४ कॅरेट सोनं आज ६,८६५ रुपयांनी स्वस्त झालं. तर चांदीच्या दरात २२,८२५ रुपयांची प्रचंड घसरण नोंदवण्यात आली. जीएसटीसह चांदीचा भाव आता ३,६७,८७७ रुपये प्रति किलोवर आला, तर २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,७३,५२९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तसेच प्लॅटिनम देखील ८,२८७ रुपयांनी घसरून ८०,४६५ रुपयांवर आलंय.

आजची मोठी घसरण होऊनही, या वर्षाच्या पहिल्या ३० दिवसांत चांदी १,२६,७४३ रुपयांनी महागली आहे, तर सोनं ३५,२८० रुपयांनी वधारलेत. आज चांदीचा भाव विना जीएसटी ३,५७,१६३ रुपये प्रति किलोवर उघडला, तर सोन्याचा भाव विना जीएसटी १,६८,४७५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. गुरुवारी चांदी ३,७९,९८८ रुपयांवर आणि सोनं १,७५,३४० रुपयांवर बंद झालं होतं. हे दर 'आयबीजेए'द्वारे (IBJA) जारी करण्यात आले.

३६ कोटी Airtel युजर्ससाठी खूशखबर; ४००० रुपयांचं 'हे' सबस्क्रिप्शन मिळणार फ्री, जाणून घ्या 

कॅरेटनुसार सोन्याचे नवे दर

२३ कॅरेट सोनं: ६,८३८ रुपयांच्या घसरणीसह १,६७,८०० रुपयांवर उघडले. जीएसटीसह याची किंमत आता १,७२,८३४ रुपये आहे.२२ कॅरेट सोनं: ६,२८८ रुपयांनी स्वस्त होऊन १,५४,३२३ रुपयांवर आलं. जीएसटीसह हा दर १,५८,९२५ रुपये आहे.१८ कॅरेट सोनं: ५,१४९ रुपयांच्या घसरणीसह १,२६,३५६ रुपयांवर उघडले असून जीएसटीसह किंमत १,३०,१४६ रुपये झाली आहे.१४ कॅरेट सोनं: ४,०१६ रुपयांनी घसरून ९८,५५८ रुपयांवर उघडलं. जीएसटीसह हा दर १,०१,५१४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold and silver prices plummet in Sarafa market after record high.

Web Summary : Gold and silver prices crashed in the Sarafa market, offering relief to buyers before wedding season. Gold fell by ₹6,865, and silver plummeted by ₹22,825. Despite the drop, both metals have seen significant gains this year.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक