Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांची चांदी! सोन्याच्या किमतीत ३ हजार तर चांदीतही मोठी घसरण; खरेदीसाठी योग्य वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:24 IST

Gold Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार दिसून येत आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षामुळे दरांमध्ये ही अस्थिरता पाहायला मिळत आहे.

Gold Silver Price : जागतिक बाजारपेठेत इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असताना, दुसरीकडे मौल्यवान धातूंच्या किमतीत मात्र काहीशी नरमाई पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्याभराच्या तुलनेत सोन्या आणि चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली असून, गुंतवणूकदार आणि दागिने खरेदीदारांसाठी ही एक दिलासादायक बातमी ठरली आहे.

आठवडाभरातील चढ-उतारगेल्या शुक्रवारी (६ मार्च २०२६) सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,६१,६७५ रुपयांवर बंद झाला होता, तर चांदी २,६८,५७९ रुपये प्रति किलोवर स्थिरावली होती. मात्र, या आठवड्यात सोन्याच्या किमतीत ३,२७५ रुपयाची घट झाली आहे, तर चांदी तब्बल ९,३३० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

खालील तक्त्यात प्रमुख शहरांतील २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे आजचे दर दिले आहेत:

शहर २४ कॅरेट (₹)२२ कॅरेट (₹)१८ कॅरेट (₹)
मुंबई १,५९,६६०१,४६,३५०१,१९,७४०
पुणे/नाशिक१,५९,७१०१,४६,४००१,१९,७९०
नवी दिल्ली१,५९,८१०१,४६,५००१,१९,८९०
चेन्नई १,६१,०२०१,४७,६००१,२४,०००
कोलकाता १,५९,६६०१,४६,३५०१,१९,७४०

चांदीची चमकही झाली कमी

चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे १० ग्रॅम चांदीचा दर २,७५० रुपये असून, १०० ग्रॅमसाठी ग्राहकांना २७,५०० रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये हा दर थोडा जास्त असून तिथे १० ग्रॅम चांदी २,८०० रुपयांवर व्यापार करत आहे.

गुंतवणुकीसाठी 'सेफ हेवन'

जागतिक स्तरावर जेव्हा राजकीय किंवा आर्थिक अस्थिरता निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीतही सोने आणि चांदी हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित आणि विश्वासाचे पर्याय मानले जात आहेत. किमतीत होणारी ही तात्पुरती घसरण गुंतवणुकीची चांगली संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

वाचा - SBI चा धमाका! २ लाखांच्या एफडीवर मिळणार १ लाखांपेक्षा जास्त व्याज; ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी

महत्त्वाची टीप: सोन्याचे वरील दर हे जीएसटी आणि मेकिंग चार्जेसशिवाय असू शकतात. अचूक दरासाठी आपल्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold and Silver Prices Drop: Good Time to Invest?

Web Summary : Gold and silver prices have fallen significantly amid global tensions, offering a potential investment opportunity. Experts suggest that this dip in prices presents a good time for long-term investment, as gold and silver remain safe-haven assets.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूकस्टॉक मार्केटअमेरिका-इस्रायल-इराण वॉर